Sharad-Pawar 
पुणे

शरद पवारांच्या आवाजाची नक्कल करून पैशांची मागणी

मंगेश पांडे

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून पैसे मागितल्या प्रकरणी तिघांवर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धीरज धनाजी पठारे (रा. यशवंतनगर, खराडी) यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी प्रतापराव वामन खांडेभरड (रा. कडाची वाडी, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे.

आरोपीने फिर्यादीसह त्यांची पत्नी व मेहुणा यांच्या मोबाईलवर वारंवार फोन केला. फोनवर तसेच प्रत्यक्ष घरी येऊन व्याजाचे पाच कोटी रुपयांची मागणी केली. ''पैसे नाही दिले तर, माझ्याशी गाठ आहे. मी तुम्हाला संपवून टाकीन'' अशी धमकी दिली. तसेच ९ ऑगस्टला एका वेबसाईटचा वापर करून तसेच अज्ञात व्यक्तिमार्फत फिर्यादीला फोन केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आवाज काढून 'धीरज पाठारे याचे पैसे देऊन टाक अन् प्रकरण संपवून टाक' अशी धमकी दिली. याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026, MI vs RCB : बंगळुरूने मारलं वानखेडेचं मैदान, मिळवला तिसरा विजय; मुंबई इंडियन्सची पराभवाची हॅट्रिक

IPL 2026: मुंबई इंडियन्सचं काय चुकतंय? RCB विरूद्धच्या पराभवानंतर हार्दिक पांड्याने स्पष्टच सांगितलं

CM Fund: आगाऊ ३०% रक्कम, ८ तासांत निर्णय अन्...; मुख्यमंत्री सहायता निधी प्रक्रियेत ऐतिहासिक बदल, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

MI vs RCB: रोहित शर्माने IPL मध्ये मोठा विक्रम रचला, पण आऊट न होताही अचानक का सोडलं मैदान? मुंबई इंडियन्सने सांगितलं कारण

दुसरी, तिसरी, चौथीचा बदलणार अभ्यासक्रम! नवीन अभ्यासक्रमासाठी ४ मेपासून शिक्षकांचे प्रशिक्षण, ३० मेपर्यंत तीन टप्प्यात शिक्षकांचे प्रशिक्षण, वाचा...

SCROLL FOR NEXT