Volkswagen India will expand in maharashtra state car auto  Sakal
पुणे

Volkswagen India : ‘फोक्सवॅगन इंडिया’ करणार राज्यात विस्तार

राज्यात मुंबई आणि पुणे शहरामध्ये ‘फोक्सवॅगन इंडिया’च्या सर्व वाहनांना ग्राहकांची मोठी मागणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्यात मुंबई आणि पुणे शहरामध्ये ‘फोक्सवॅगन इंडिया’च्या सर्व वाहनांना ग्राहकांची मोठी मागणी आहे. आता राज्यात विस्तार करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. मेट्रो शहरांसह राज्यातील इतर शहरी व निमशहरी भागातही ‘फोक्सवॅगन इंडिया’च्या वाहनांना मागणी वाढत असून ती पूर्ण करण्यासाठी पावले उचलत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

‘फोक्सवॅगन इंडिया’चे मुख्यालय आणि उत्पादन कारखाने राज्यात आहेत. ‘फोक्सवॅगन इंडिया’च्या एकूण वाहन विक्रीमध्ये राज्याचे योगदान १५ टक्के आहे. त्यामुळे छोट्या शहरांमध्ये वितरण साखळीचा विस्तार करण्यासाठी धोरणात्मक गुंतवणूक केली आहे. त्यामुळे अधिकाधिक ग्राहकांना ‘फोक्सवॅगन’ची वाहने विकत घेणे सहज शक्य होत आहे, असेही कंपनीने स्पष्ट केले.

गाड्यांची देखरेख, दुरुस्ती तसेच इतर सर्व सेवा आणि सुविधा सहज उपलब्ध व्हाव्यात, यासाठी कंपनीने या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात डीलरशिप व सर्व्हिस सेंटर उभारली आहेत. वाहनांच्या विक्री-पश्चात ग्राहकांना सेवा पुरवण्याला कंपनीने प्राधान्य दिले आहे. तसेच, वापरण्यासाठी अतिशय सोपे संकेतस्थळ आणि समाजमाध्यमांवरून सातत्याने साधलेला संवाद, यातून ग्राहकांना आपल्याशी जोडून ठेवण्यात यश मिळवले असल्याचे कंपनीने नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी केरळमच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दाखल

SC on Hinduism: श्रद्धा सिद्ध करण्यासाठी मंदिरात जाण्याची गरज नाही, हिंदू धर्माबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निरीक्षण

SCROLL FOR NEXT