मतदार यादीवर दावे, हरकतीस प्रारंभ
प्रारूप यादी प्रसिद्ध ः ३३ लाख ८३ हजार १८७ मतदारांचा समावेश
अहिल्यानगर, ता. ३१ ः मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ आॅगस्ट ते ३० सप्टेंबर दरम्यान दावे व हरकती दाखल करण्याचा प्रारंभ करण्यात आला आहे. तसेच मतदारसंघनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. नोटीस टप्पा, दावे व हरकती निकालात काढण्यासाठी ३१ आॅगस्ट ते २९ सप्टेंबर हा कालावधी देण्यात आला आहे, तर ४ आॅक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
प्रारूप मतदार यादी संबंधित मतदान केंद्राच्या ठिकाणी तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी याचे कार्यालय तसेच ahilyanagar.nic.in या जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील मान्यता प्राप्त राजकीय पक्षांनाही प्रारूप मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या मतदारांनी गणनापत्रक बीएलओकडे जमा केलेले नाही, अशा ४ लाख २६ हजार ९३० मतदारांची नावे ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट असणार नाहीत. त्यामध्ये मृत मतदार १ लाख ४१ हजार २१२, गैरहजर ५० हजार १६७, कायमस्वरूपी स्थलांतरित १ लाख ७१ हजार ७१९, इतर १ हजार १२५ आणि यापूर्वीच नोंदणी झालेले ६२ हजार ७०७, अशा मतदारांचा समावेश आहे. यापैकी मृत मतदार वगळता जिल्ह्यातील एकही पात्र मतदार यादीमध्ये नाव येण्यापासून वंचित राहू नये, या उद्देशाने मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांची कार्यालये, तहसीलदार कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी याचे कार्यालय तसेच जिल्ह्याचे संकेतस्थळावर पाहण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
इन्फो
मतदार संघनिहाय मतदार संख्या
अकोले २ लाख ५२ हजार २५१, संगमनेर २ लाख ६३ हजार ११४, शिर्डी २ लाख ५३ हजार ५४४, कोपरगाव २ लाख ५० हजार ७६, श्रीरामपूर २ लाख ७४ हजार ७२६, नेवासे २ लाख ६५ हजार ३८९, शेवगाव ३ लाख ३५ हजार ५५७, राहुरी २ लाख ९५ हजार ६७२, पारनेर ३ लाख १९ हजार ६०९, अहमदनगर शहर २ लाख ४६ हजार ४२४, श्रीगोंदे ३ लाख ०८ हजार ११६, कर्जत जामखेड ३ लाख १८ हजार ७०९. एकूण मतदार ः ३३ लाख ८३ हजार १८७.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.