पुणे

मतदार यादी पुनरीक्षणासाठी विशेष शिबिर

CD

सर्वच मतदान केंद्रावर
‘एसआयआर’चे शिबिर

सोलापूर, ता. १७ : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र नागरिकांची, विशेषतः नवमतदार, महिला व दिव्यांग नागरिकांची शंभर टक्के नोंदणी पूर्ण व्हावी, यासाठी प्रशासनामार्फत विशेष नोंदणी शिबिर होणार आहेत. १९, २०, २६ व २७ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत विशेष नोंदणी शिबिरे होणार असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुणे यांनी दिली.
१ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांना नमुना क्र. ६ मध्ये अर्ज करता येईल. मतदार यादीतील चुकीची नोंद तसेच मयत अथवा स्थलांतरित मतदाराचे नाव वगळण्यासाठी नमुना क्र. ७ मध्ये अर्ज करता येईल. तसेच मतदार यादीतील नाव, वय, लिंग, नातेसंबंध, पत्ता आदी तपशीलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी नमुना क्र. ८ मध्ये अर्ज करता येईल.
या विशेष शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांसोबत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींनीही उपस्थित राहावे, अशा सूचना संबंधित राजकीय पक्षांना देण्यात येणार आहेत. शिबिरांमध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून नागरिकांचे मतदार नोंदणी, दुरुस्ती अथवा नाव वगळणीचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IMD Weather Alert : हवामानाचा मोठा उलटफेर! महाराष्ट्रासह 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, ताशी 85 किमी वेगाने वाहणार वारे; माॅन्सून परतण्यापूर्वी वाढणार चिंता

IND VS AFG 3RD T20I: २० चेंडूंत १०२ धावा... Abhishek Sharma ने ट्वेंटी-२०चा इतिहास-भूगोल बदलला! एक नव्हे अनेक विक्रम मोडले, सेलिब्रेशन तर भारीच केले Video Viral

Tarapur Leopard Scare: तारापूर-चिंचणी परिसरात बिबट्याला गुरांचा चोप; नागरिकांमध्ये भीती, वनविभागाकडे जेरबंदाची मागणी

Latest Marathi News Update : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरे गावी दाखल

IND VS AFG 3RD T20I: अभिषेक शर्माने इतिहास रचला; ट्वेंटी-२०तील सर्वात वेगवान शतक!मोडला रोहित शर्माचा विक्रम, विराटशी बरोबरी

SCROLL FOR NEXT