भोर, ता. २ : भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती दाखल करण्यासाठी १२ ऑक्टोबर २०२६पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘नो मॅपिंग’ किंवा तार्किक विसंगतीमुळे नोटीस प्राप्त झालेल्या मतदारांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही. संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी भेट देऊन आवश्यक कागदपत्रे स्वीकारणार आहेत. त्यामुळे पात्र मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी, दुरुस्ती तसेच हरकती नोंदविण्याची पुन्हा संधी उपलब्ध झाली आहे, अशी माहिती तहसीलदार राजेंद्र नजन यांनी दिली.
कागदपत्रे अपूर्ण असल्यास आवश्यकतेनुसार अपवादात्मक परिस्थितीत ऑनलाइन सुनावणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. वाढीव कालावधीत कोणताही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी ३, ४, १० आणि ११ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये ५ ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत पात्र विद्यार्थ्यांची ऑनलाइन मतदार नोंदणी करण्यात येणार आहे. तसेच औद्योगिक आस्थापना, कंपन्या, कारखाने आणि विविध संस्थांमधील पात्र नागरिकांची मतदार नोंदणी वाढविण्यासाठी १२ ऑक्टोबरपर्यंत मतदार जागृती व विशेष नोंदणी उपक्रम राबविण्यात येणार आहे. विशेष शिबिरे तसेच ऑनलाइन सुविधांचा लाभ घ्यावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले असल्याचेही तहसीलदार राजेंद्र नजन यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.