सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. १८ : मतदारयाद्यांच्या सखोल पडताळणी मोहिमेवेळी ज्या लोकांना आपली माहिती सादर करता येऊ शकली नव्हती, तसेच ज्या लोकांची नावे यादीतून वगळण्यात आली होती, असे लोक त्यांचे नाव पुन्हा यादीत येण्यासाठी ‘अर्ज ६’ जमा करू शकतात, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिल्ली उच्च न्यायालयात दिली आहे.
विविध कारणांमुळे ज्या लोकांची यादीतून वगळली गेली होती, त्यांना अर्ज ६ ऐवजी अर्ज ८ भरण्याची मुभा देण्याचे निर्देश दिले जावेत, अशा विनंतीची याचिका न्यायालयात दाखल झाली होती. स्थलांतरणामुळे अनेक लोकांना मतदारयादीत समाविष्ट करण्याबाबतचे अर्ज भरता आले नव्हते, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला होता. अर्ज ६ जमा केल्यास चुकीची माहिती दिल्याचा आरोप याचिकाकर्त्यावर होऊ शकतो, असे म्हणणे चुकीचे ठरेल, अशी टिपणी न्यायालयाने केली. तसेच, मतदार नोंदणी नियम १९६० अन्वये अर्ज ६ भरून याचिकाकर्ते आपल्या समस्येचे समाधान करू शकतात, असेही न्या. दिनेश मेहता आणि न्या. आदिती चौधरी यांच्या खंडपीठाने सांगितले.
अर्ज ६ हा मतदारयादीत नाव जोडला जाण्यासाठीचा अर्ज आहे. यात अर्जदाराला आपली वैयक्तिक माहिती द्यावी लागते. मतदारयादीत पहिल्यांदा नाव जोडले जाण्यासाठी आपण अर्ज करत आहोत, असे त्याला घोषित करावे लागते. चुकीची माहिती दिल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते, ही याचिकाकर्त्यांची चिंता निराधार आहे, कारण निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार अर्ज ६ जमा करण्याचा सल्ला आयोगाच्या वकिलाने दिला होता, असे न्यायालयाने सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.