Deepak-Mhaisekar
Deepak-Mhaisekar 
पुणे

लोकशाहीसाठी मतदान करा - डॉ. म्हैसेकर

सकाळवृत्तसेवा

पुणे - लोकशाही व्यवस्थेत नागरिकांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला आहे. या अधिकाराचा वापर करून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने मतदान करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे केले.

भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मतदान प्रक्रियेच्या जनजागृतीसाठी दरवर्षी 25 जानेवारी रोजी "राष्ट्रीय मतदार दिवस' साजरा करण्यात येतो. या निमित्त येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ. म्हैसेकर बोलत होते. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पोलिस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंग, प्राचार्य डॉ. डी. बी. आहुजा, उपविभागीय अधिकारी ज्योती कदम, जलतरणपटू सुयश जाधव, अभिनेता रमेश परदेशी आदी या वेळी उपस्थित होते.

'सुशिक्षित मतदार, निवडणूक प्रक्रियेतील सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन मतदानाची टक्केवारी वाढवावी,'' असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले.

मतदार नोंदणी मोहिमेमध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल मतदार नोंदणी अधिकारी स्नेहल बर्गे, सुषमा चौधरी, रोहिणी घाडगे, वर्षा सकपाळ यांच्यासह सानिका कुलकर्णी, तीर्थ पुराणिक, संस्कृती माटे, प्रणव चाळके आणि रेणुका पाटील या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तत्पूर्वी बोट क्‍लब ते अभियांत्रिकी महाविद्यालयादरम्यान प्रबोधन रॅली काढण्यात आली.

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी डॉ. म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. निवडणूक सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व सरकारी विभागांनी परस्परांमध्ये समन्वय ठेवून निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयारी करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : सत्ता नसतानाही विकास करता येतो

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 9 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानासाठी परदेशातील पुणेकर शहरात दाखल

Loksabha Election 2024 : बारामतीत वाढलेली लाखभर मते ठरविणार खासदार ; एकूण ५९.५० टक्के मतदान,पुरुषांचा टक्का वाढला, महिलांचा प्रतिसाद कमी

Latest Marathi News Live Update : महिला अपहरणप्रकरणी रेवण्णा यांना सात दिवसांची न्यायालयीन कोठडी

SCROLL FOR NEXT