PMRDA sakal
पुणे

PMDRA : महानगर नियोजन समितीसाठी येत्या बुधवारी मतदान

पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील २२ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदासाठी १० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी तालुक्‍याचे ठिकाण, पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेसह एकूण १४ मतदान केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या निवडणुकीसाठी ९७९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. तर १२ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

पुणे महानगर नियोजन समितीच्या ३० जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील २२ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात आहे. तर नगरपालिका क्षेत्रातील १ जागेसाठी ३ उमेदवार आणि ग्रामपंचायत क्षेत्रातील ७ जागांसाठी २१ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ३० जागांसाठी एकूण ४७ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी ताकद लावली आहे. ग्रामीण क्षेत्रात मोठ्या संख्येने उमेदवार असल्याने या क्षेत्रात ही निवडणूक चुरशीची होणार आहे.

या निवडणुकीसाठी मावळ पंचायत समिती, शिरूर पंचायत समिती सभागृह, पुरंदर पंचायत समिती, खेड पंचायत समिती, दौंड नविन प्रशासकीय इमारत, भोर तहसील कार्यालय, हवेली पंचायत समिती, मुळशी पंचायत समिती, वेल्हे तहसील कार्यालय, पुणे महानगरपालिका इमारत, पिंपरी-चिंचवड पालिका इमारत या ठिकाणी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table : लखनौ सुपर जायंट्सचा पराभवाचा चौकार; राजस्थान रॉयल्स विजयासह गुणतालिकेत थेट दुसऱ्या क्रमांकावर

Steve Smith Century: १८ चेंडूंत ८४ धावा! स्टीव्ह स्मिथने पाकिस्तानी गोलंदाजांना 'सोलले'; PSL २०२६ मधील वेगवान शतक झळकावले

Pune Cyber Fraud News : विवाह संकेतस्थळावर इस्रो शास्त्रज्ञ बनून २६.५० लाखांची फसवणूक; तोतया आरोपी येरवडा पोलिसांच्या जाळ्यात

Pune Accident : पुण्यात दत्तवाडीत घराच्या दरवाजावर पडलेल्या विजेच्या तारेचा जबर धक्का; मुलीला वाचवताना आईही जखमी

Maharashtra Sarkari Karmachari Strike: रायगडसह राज्यात शासकीय कामकाज ठप्प; सकारात्मक चर्चेनंतरही कर्मचाऱ्यांचा संप उद्याही सुरूच

SCROLL FOR NEXT