ओतूर, ता. १६ ः उंब्रज नं. १ (ता. जुन्नर) येथील वृषाली राजेंद्र राऊत हिची इटलीतील प्रतिष्ठित मिलानो-बिकोका विद्यापीठात (Università degli Studi di Milano-Bicocca) पीएचडी संशोधनासाठी निवड झाली आहे.
वृषालीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून आता ती मिलानो-बिकोका विद्यापीठाच्या मटेरिअल सायन्स विभागात संशोधन करणार आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून या संशोधनासाठी निवड झालेली ती एकमेव विद्यार्थिनी आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने आपल्या मेहनतीच्या जोरावर परदेशातील प्रतिष्ठित विद्यापीठात स्थान मिळविल्याने उंब्रज गावासह संपूर्ण जुन्नर तालुक्याचा गौरव झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.