पुणे

पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षाथॉन हाफ मॅरेथॉन

CD

पुणे, ता. १४ : पर्यावरण संवर्धन आणि शारीरिक तंदुरुस्तीबाबत जागृती करण्यासाठी पुणे शहर पोलिस, वन विभाग आणि वृक्षाथॉन फाउंडेशनने ‘वृक्षाथॉन हाफ मॅरेथॉन ५.०’चे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ७ जूनला शिवाजीनगर येथील पोलिस मैदानावर होणार आहे.
‘आरोग्यासाठी धावा, पर्यावरणासाठी धावा’ ही मॅरेथॉनची संकल्पना आहे. पर्यावरण रक्षण आणि वृक्षारोपणाचा संदेश घराघरांत पोहोचवणे, हा मुख्य उद्देश आहे. मॅरेथॉनमध्ये सर्व वयोगटांतील नागरिकांना प्रवेश असून ३, ५, १० किलोमीटर आणि हाफ मॅरेथॉन, या प्रकारात ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक धावपटूला एक ‘देशी रोपटे’ भेट दिले जाणार आहे. या मॅरेथॉनसाठी पुणे पोलिस सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, पुणे विभागाचे वनरक्षक आशिष ठाकरे यांच्यासह राज्याच्या विविध भागांतील धावपटू, विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक संचालक विजय गायकवाड यांनी दिली. स्पर्धेची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुकांनी www.vrukshathon.com या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

September 1 Rule Changes 2026 : सप्टेंबर १ तारखेपासून बदलणार ५ महत्त्वाचे नियम; सामान्यांच्या खिशावर परिणाम, LPG सिलिंडरपासून कारच्या किमतीपर्यंत मोठे बदल

Gram Panchayat Delimitation: प्रभागरचनेचे काम, तलाठ्यांना घाम ; ग्रामपंचायतीकडेच सोपवा; संघटनेची महसूल विभागाकडे मागणी

Laxman Hake: ओबीसी आरक्षणासाठी मोठा एल्गार! लक्ष्मण हाकेंची मोठी घोषणा; मुंबईकडे कूच करण्याचा निर्धार

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

15000 Teacher Recruitment : TET ची अट रद्द! राज्यात 15 हजार शिक्षकांची मेगा भरती; 600 क्रीडा शिक्षकांसाठी स्वतंत्र पात्रता निकष जाहीर, ऑनलाईन मागविले अर्ज

SCROLL FOR NEXT