pune sakal
पुणे

‘व्हीएसआय’च्या मराठवाड्यातील नवीन केंद्रासाठी ७१ कोटींच्या खर्चास मंजुरी

शरद पवार यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाचा निर्णय

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात पाथरवाला (ता. अंबड) येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने नवीन केंद्र उभारण्यात येत आहे. त्याठिकाणी ७१ कोटी १६ लाख रुपये खर्च करून प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळा, प्रशिक्षण केंद्र आदी पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. या नवीन केंद्राचा लाभ मराठवाडा, खानदेश आणि विदर्भातील साखर कारखाने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या (व्हीएसआय) सभागृहात मंगळवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे, आमदार रोहित पवार, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील, साखर आयुक्त शेखर गायकवाड, ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख, विशेष कार्यकारी अधिकारी संभाजी कडू पाटील आदी या वेळी उपस्थित होते.

शेतकऱ्यांपर्यंत निविष्ठा पोचविण्यासाठी प्रयत्न करणार

‘व्हीएसआय’ची सर्व उत्पादने, निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी विक्री व्यवस्था सक्षम करण्यात येणार आहे. त्यासाठी साखर कारखान्यांचा सहभाग वाढविण्यात येणार आहे. तसेच, शेतकरी गटांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. विविध प्रकारच्या उसाच्या जातींची लागवड करण्यात येणार आहे. ‘व्हीएसआय’ची जैविक उत्पादनेही शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी विक्री व्यवस्थेचे सबलीकरण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT