W-20 Conference Women Empowerment organized Pune G-20 World Conference sakal
पुणे

Pune News : महिला सक्षमीकरणासाठी डब्ल्यू -२० परिषदेचे पुण्यात आयोजन

जी-२० या जागतिक परिषदेच्या अनुषंगाने होणार परिषद

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जी - २० या जागतिक संमेलनाचे यजमानपद सध्या भारत भूषवीत असून त्याच निमित्ताने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण आणि लिंगसमानता या महत्त्वाच्या विषयांवर जागरण व्हावे यासाठी ‘डबल्यू-२०’ (वूमन -२०) परिषद आयोजित करण्यात आली आहे.

या परिषदेचे यजमानपद महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडे आहे. या परिषदेमध्ये जी-२० देशांमधील महिला उद्योजक व सामाजिक क्षेत्रातील महिला नेतृत्वाचा समावेश असेल. अशी माहिती परिषद संयोजिका डॉ. मंजू हुंडेकर आणि संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्र देव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. हुंडेकर म्हणाल्या, ‘‘महिला सक्षमीकरणाचा महत्त्वपूर्ण विषय जी-२० च्या पटलावर केंद्रस्थानी यावा, हे डब्ल्यू २० परिषदेचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतामधील डब्ल्यू २० समूहामध्ये शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी म्हणून एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाचा समावेश झालेला असून या विद्यापीठाने महिलांसाठीच्या या परिषदेच्या आयोजनामध्ये महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेची निवड केली आहे.

ही परिषद ७ ते ८ एप्रिल या कालावधीत संस्थेच्या ‘स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी’, नऱ्हे येथे होणार आहे. सर्व क्षेत्रांत महिलांचा सहभाग, आर्थिक निर्णयांत महिलांचा अंतर्भाव, महिला व तंत्रज्ञान, महिला आणि डिजिटल कौशल्ये आदी विषयांवर चर्चा होणार आहे.’’

परिषदेचे उद्घाटन राज्याचे उच्‍च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे हस्ते होणार आहे. एस.एन.डी.टी महिला विद्यापीठाच्या (मुंबई) कुलगुरू डॉ. उज्ज्वला चक्रदेव, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर आदी उपस्थित राहणार आहेत. असे देव यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Judicial Employees Protest: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा लवकरच एल्गार; राज्यातील ३४ हजार कर्मचारी समान वेतनासाठी एकवटणार

Dubai Work Reality : दुबईतील झगमगाटामागे दडलंय भयाण वास्तव! भारतीय तरुणाने अवघ्या २ मिनिटांत दाखवली काळी बाजू, पाहा VIDEO

‘स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू’ पाठराखीण मालिकेतील अभिनेत्रींचा मराठमोळ्या लूकमध्ये भन्नाट डान्स, Viral Video

Marathi News Live Updates : पुण्यात पवारांनी भाकरी फिरवली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आता दोन शहराध्यक्ष

Shiv Sena Split: निवडणूक आयोगाचा निर्णय चुकीचा? ठाकरे गटाचा सुप्रीम कोर्टात दावा; ‘शिवसेनेत नव्हे, विधिमंडळात फूट’

SCROLL FOR NEXT