Wablewadi School  Sakal
पुणे

...अखेर 'त्या' वाबळेवाडी शाळेतील वारे गुरुजींचे निलंबन मागे

वारे हे वाबळेवाडी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक होते. परंतु त्यांच्यावर काही आरोप झाल्याने जिल्हा परिषदेने त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिरूर तालुक्यातील वाबळेवाडी येथील अटलबिहारी वाजपेयी इंटरनॅशनल स्कूलचे माजी प्रभारी मुख्याध्यापक आणि विद्यमान सहशिक्षक दत्तात्रेय वारे यांच्यावरील निलंबनाची कारवाई अखेर पुणे जिल्हा परिषदेने मंगळवारी (ता.१) मागे घेतली. एकदा निलंबित कर्मचाऱ्याला पुन्हा मूळ ठिकाणी नियुक्ती देता येत नसल्याने, वारे यांना खेड तालुक्यात नवीन नियुक्ती देण्यात आल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना सांगितले. (Wablewadi School case)

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी निलंबन पुनर्विलोकन समितीची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषद स्तरावरून केवळ नियुक्तीचा तालुका दिला जातो. तेथील गट शिक्षण अधिकारी त्यांना कोणत्या शाळेवर नियुक्ती द्यावी, याबाबतचा निर्णय घेत असतात, असेही प्रसाद यांनी यावेळी स्पष्ट केले.

वारे हे वाबळेवाडी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक होते. परंतु त्यांच्यावर काही आरोप झाल्याने जिल्हा परिषदेने त्यांची चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. ही चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिरूर तालुक्यातील काही महिला जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत केली होती. या मागणीनुसार जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेत वारे यांना निलंबित करण्याचा आदेश अध्यक्षा पानसरे यांनी दिला होता.

परंतु या निलंबनानंतर राज्यात मोठी खळबळ उडाली होती. वारे यांच्यावरील निलंबनाची कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात आल्याचा आरोप राज्यभरातून केला जाऊ लागला होता. अखेर सामाजिक दबावामुळे जिल्हा परिषदेने वारे यांच्यावरील निलंबन कारवाई मागे घेतल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात रंगू लागली आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार नियमानुसारच वारे यांनी शाळेला देणग्या घेतल्या होत्या, असे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. त्यानंतर स्थानिक विद्यार्थ्यांना या शाळेत प्रवेश मिळत नसल्याची तक्रार एका पालकाने जिल्हा परिषदेकडे केली होती. या तक्रारीनंतर त्यांची चौकशी सुरू केली आहे. चौकशी सुरु होताच, त्यांना प्रभारी मुख्याध्यापक पदावरून दूर केले असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद यांनी स्पष्ट केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

Latest Marathi News Live Update : कोकणातही दुष्काळाची परिस्थिती; भातपिकाला मोठा फटका

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT