wada khed maruti suzuki car caught fire damage fire brigade police Sakal
पुणे

Pune Car Accident : वाडा येथे बर्निंग कारचा थरार, कार अगीच्या भक्षस्थानी

येथे रस्त्याच्या कडेला उभी केलेल्या मारूती कारने अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली, घटनास्थळी कार पेटताना मोठे आवाज होत असल्याने परिसरात काही वेळ घबराटीचे वातावरण पसरले होते.

राजेंद्र लोथे

वाडा : येथे रस्त्याच्या कडेला उभी केलेल्या मारूती कारने अचानक पेट घेतल्याने कार जळून खाक झाली, घटनास्थळी कार पेटताना मोठे आवाज होत असल्याने परिसरात काही वेळ घबराटीचे वातावरण पसरले होते.

वाडा येथे रविवार ता. ११ रोजी धर्मनाथ महाराजांचा उत्सव असल्याने कान्हेवाडी ( ता. खेड ) येथील सतीष निमसे हे आपली मारूती कार ( एम एच १४ जे एम ६८४५ ) घेवून वाडा येथे उत्सवासाठी आले होते.

त्यांनी आपली कार रस्त्याच्या कडेला उभी करून यात्रा उत्सवानिमीत्त आयोजीत बैलगाडा शर्यतींचा आनंद घेत असताना अचानक उभ्या केलेल्या गाडीने पेट घेतला. आग एवढी भयानक होती कि जवळ जाण्यास कोणीही धजावत नव्हते या शिवाय जवळपास कोणतीही अग्नीशामक यंत्रणा नसल्याने काही वेळातच कार पुर्णपणे जळून खाक झाली.

कार जळत असताना छोटे स्पोटासारखे आवाज येत असल्याने काही काळ नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. आगीचे रौद्र रूप पाहून बैलगाडा घाटातील नागरिक घटनास्थळी येत गर्दी करू लागल्याने सुरक्षेच्या कारणामुळे पोलीसांनी गर्दी पांगवली मात्र आग विझवण्यात यश न आल्याने पुर्ण गाडी भस्मसात झाली. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

Summer Heatwave : उन्हाच्या तडाख्याने कळपावर संकट; २८ मेंढ्यांचा मृत्यू, ७० मेंढ्यांवर उपचार सुरू

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Electricity Bill Saving Tips : सरकारने स्वतःच सांगितली लाईट बिल कमी करण्याची पद्धत; मीटर पळेल एकदम हळू, पाहा सोपी ट्रिक

Latest Marathi News Live Update: खरात प्रकरणाच्या सुनावणीसाठी सरकारी वकील कोर्टात दाखल

SCROLL FOR NEXT