वडगाव निंबाळकर, ता. २६ : बारामती तालुक्याच्या पश्चिम भागातील वडगाव निंबाळकर आणि परिसरातील गावांमध्ये जिओ नेटवर्क वारंवार ठप्प होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. डिजिटल व्यवहार आणि शैक्षणिक कामात अडथळे येत असून, संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून या भागात कधी अर्धा तास तर कधी दिवसभर मोबाईल सेवा विस्कळीत होत आहे. सध्याच्या डिजिटल युगात बँक व्यवहारांचे ओटीपी, ऑनलाईन शिक्षण आणि वैद्यकीय आपत्कालीन संपर्कासाठी मोबाईल अनिवार्य आहे. मात्र, नेटवर्कअभावी हे सर्व व्यवहार ठप्प होत आहेत. रिचार्जचे पूर्ण पैसे भरूनही सेवा मिळत नसल्याने ग्राहकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. कस्टमर केअरकडूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
ग्रामीण भागात टॉवर्सची संख्या कमी असणे आणि देखभालीचा अभाव यामुळे ही समस्या उद्भवत असल्याचे बोलले जात आहे. स्थानिक प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून कंपनीला सेवा सुधारण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी होत आहे.
‘‘नेटवर्क नसल्यामुळे डिजिटल व्यवहार पूर्णपणे ठप्प होत आहेत. अनेकदा दुकाने बंद ठेवण्याची वेळ येते. यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.’’
-शशिकांत कोंढाळकर, व्यावसायिक, कोऱ्हाळे बुद्रुक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.