पुणे

वडगाव शेरी परिसरात इतिहास अन् संस्कृतीची सांगड

CD

वडगाव शेरी, ता. २२ : वडगाव शेरी परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी यंदा सजावटीपलीकडे जाऊन देखाव्यांना विचारांचा चेहरा दिला आहे. कुठे सामाजिक वास्तवाचे प्रतिबिंब उमटले आहे, तर कुठे इतिहास, संस्कृती, पर्यावरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालण्यात आली आहे. आकर्षक विद्युत रोषणाई, भव्य प्रतिकृती, कलात्मक मांडणी आणि संदेश देणारे प्रसंग यामुळे मंडळांचे परिसर जणू छोटेखानी कलादालनांमध्ये रूपांतरित झाले आहेत. सोहळ्याचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

क्रांतिवीर उत्सव मंडळाने राजहंस रथात गणरायाला विराजमान केले आहे. मंडळामार्फत वर्षभर गणेश जयंती, शिवजयंती तसेच राष्ट्रीय सण साजरे केले जातात. आरोग्य शिबिर, वारकरी अन्नदान यांसारखे विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. गणेशोत्सव काळात महाआरती व सामूहिक अथर्वशीर्ष पठण, भजन सेवा असे उपक्रम राबविले जातात

जय गणेश मित्रमंडळाने छत्रपती शिवाजी महाराज यांनी रांझ्याच्या पाटलाचा चौरंग केल्याचा ऐतिहासिक हलता देखावा सादर केला आहे. देखावा पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे.

आझाद हिंद मित्रमंडळ ट्रस्टने गणेशोत्सव काळात रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम आयोजित केले आहेत. यावर्षी मंडळाने व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण हा देखावा केला आहे, तसेच या देखाव्याचा माहितीपट दाखविण्यात आला आहे. सामाजिक प्रबोधनाचा वारसा जपणारे हे मंडळ आहे.

वडगाव शेरी गावठाणमधील भैरवनाथ तरुण मंडळाने आदिशक्ती तुळजाभवानी माता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आधारित ऐतिहासिक देखावा साकारला आहे.

वडगाव शेरी गावठाणातील अमर मित्रमंडळाने यावर्षी जेजुरी गडाची प्रतिकृती साकारली आहे. मंडळाचे कार्यकर्ते स्वतः देखावा तयार करतात. ध्वनिवर्धकविरहित विसर्जन मिरवणूक हे मंडळाचे वैशिष्ट्य आहे. मंडळाच्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

सोपाननगर येथील शिवसाई मित्रमंडळाने यावर्षी ‘वृदांवन’ हा देखावा केला आहे. हा आकर्षक देखावा पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

रामवाडी गावातील हिंद तरुण मंडळाने यंदा छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ल्यांवर आधारित देखावा सादर केला आहे. पारंपरिक ढोल-ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक काढली जाते. गावामध्ये ‘एक गाव, एक गणपती’ आहे.

सोपाननगर मित्रमंडळाची आकर्षक गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

सुनीतानगरमधील शिवगणेश मित्रमंडळाने यंदा नेत्रदीपक विद्युत रोषणाई केली आहे.
बॉम्बे सॅपर्स मित्रमंडळाने ‘संत नामदेव महाराजांची पायरी’ हा पौराणिक देखावा तयार केला आहे.
त्रिंबकेश्वर मित्रमंडळाने काल्पनिक मंदिराचा सुरेख देखावा साकारला आहे.

धर्मवीर संभाजी मित्रमंडळ ट्रस्टने आकर्षक काल्पनिक मंदिराचा देखावा तयार केला आहे. मंडळाच्या वतीने दहा दिवस विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.

वडगाव शेरीमधील मतेनगर प्रतिष्ठानने विविधरंगी आकर्षक फुलांच्या सजावटीत गणरायाला विराजमान केले आहे. मंडळाच्या वतीने दहा दिवस विविध उपक्रम राबविले जातात.
सोमनाथ नगरमधील एकता मित्रमंडळाने यंदाचा सामाजिक संदेश देणारा ‘पर्यावरण संवर्धन – काळाची गरज!’ हा देखावा सादर केला आहे.
सुवर्ण भारत मित्रमंडळाने यंदा १० फुटांची गरुडावर विराजमान झालेल्या आकर्षक गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे.
श्रीमंत ओमकार मित्रमंडळाने गणेशोत्सवात ऑर्केस्टा, होम मिनिस्टर, बाल मेळावा, रक्तदान शिबिर, विविध स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
वडगाव शेरीतील शिवकल्प मित्रमंडळाने आदियोगीचा सुंदर देखावा साकारला आहे. शिवप्रताप मित्रमंडळाने नेत्रदीपक विद्युत रोषणाई केली आहे. मंडळाच्या वतीने दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.
कल्याणीनगर मित्रमंडळाने आकर्षक मंदिरांचा देखावा उभारला आहे. नवयुग तरुण मंडळाने विविधरंगी फुलांची सजावट केली आहे. विमाननगर येथील मारुती मित्रमंडळ ट्रस्टने महाराष्ट्रातील संतांची परंपरा सांगणारा देखावा उभारला असून, मंडळाचे अध्यक्ष प्रशांत गोरे, उपाध्यक्ष प्रमोद सोरटे, मंडळाचे संस्थापक मारुती देवकर पाटील आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

E20मुळे गाड्या खराब होत नाहीत, ऑक्टोबरमध्ये 100 टक्के इथेनॉलवर चालणारी कार येणार : केंद्रीय मंत्री गडकरी

Mumbai News: रेल्वे पोलिसांच्या कोठडीत ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू, शौचालयात गेला अन्...; CSMTवर काय घडलं?

जमुईतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारावर मंत्री श्रेयसी सिंह यांचं वादग्रस्त वक्तव्य; विरोधकांकडून जोरदार हल्लाबोल

Marathi News Live Updates: पाण्याची टाकी पाडताना जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू

Lung Health: तुमचं वय वाढतंय अन् फुफ्फुसे वेगाने थकतात! वयानुसार 'लंग हेल्थ' कडे दुर्लक्ष नका करू; वाचा काय सांगतात तज्ज्ञ...

SCROLL FOR NEXT