पुणे

पुण्यातील 'हा' भाग झाला कोरोनामुक्त!

सकाळवृत्तसेवा

वाघोली : वाघोलीतील चौथ्या रुग्णालाही शनिवारी रात्री उशिरा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. यामुळे वाघोली आता कोरोनामुक्त झाली आहे. दरम्यान इतरत्र भागातून वाघोलीत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाने येताच तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून त्यांच्या सूचनांचे पालन करावे तसेच 14 दिवस क्वारंटाईन रहावे असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.

15 एप्रिल रोजी सर्व प्रथम या 55 वर्षीय नागरिकाला कोरोना झाल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर वाघोलीत त्वरित रुग्णालये, मेडिकल व डेअरी वगळता किराणा व भाजी पाला विक्री त्वरित थांबविण्यात आली. यानंतर चार दिवसात तीन रुग्णांची भर पडली. मात्र, चारही रुग्णांनी कोरोनावर मात केली. गुरुवारी रात्री दोघांना, शनिवारी दुपारी तिसऱ्या तर रात्री उशिरा चौथ्या रुग्णाला डिस्चार्ज मिळाला. नागरिकांनी डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत, पोलीस, शिक्षक व महसूल कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आता अधिक सतर्कता गरजेची

वाघोली आता कोरोनामुक्त झाली आहे. लॉकडाऊनचा कालावधीही उद्यापासून पुन्हा 14 दिवसांसाठी वाढला आहे. प्रत्येक वाघोलीकराने त्याचे शिस्तीने पालन केले पाहिजे. अद्यापही अनेकजण विनाकारण बाहेर पडताना दिसतात.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सर्व शासकीय यंत्रणा आवश्यक ती काळजी घेत आहेत. मात्र, नागरिकांचे सहकार्य गरजेचे आहे. कोरोनाबरोबर आर्थिक संकटालाही सगळ्यांना तोंड द्यायचे आहे. लॉकडाऊनचा कालावधी वाढू द्यायचा नसेल तर आपणही एक योद्धा आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: टीम इंडियाचे घालीन लोटांगण! इंग्लंडने ७६ धावांवर श्रेयस अय्यरच्या संघाला गुंडाळले; फलंदाज तोंड लपवताना दिसले

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

SCROLL FOR NEXT