पुणे

वाघोलीत घरफोडी करणाऱ्याला अटक

CD

वाघोली, ता. १७ : वाघोली परिसरात दुकानांचे पत्रे उचकटून घरफोडी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून कपडे, मोबाइल, रोख रक्कम व पॉलीकॅब वायर असा ९६ हजार ६७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
वाघोली पोलिस ठाण्यातील ३ व लोहगाव पोलिस ठाण्यातील १ असे एकूण ४ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तेजस विष्णू मेंढके (वय ३२ वर्ष, रा. वाघोली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांतील तपास करीत असताना पोलिस कर्मचारी योगेश शिंदे यांना माहिती मिळाली की, दुकानांचे पत्रे उचकटून घरफोड्या करणारा व्यक्ती गायरान परिसरात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने तत्काळ कारवाई करत संशयित आरोपी मेंढके याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर व सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, गुन्ह्यांमधील त्याचा सहभाग निष्पन्न झाला.  ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, मंगेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे पोलिस उपनिरीक्षक शिवशंकर राघू यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Medical Courses Admission : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या फेरीअखेर १० हजार ३९५ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

IND vs WI 5th T20I: चिन्नास्वामीवर Fire Alarm वाजला, भारतीय क्रिकेटपटूच्या फोनवर Emergency Alert अन्...; नेमकं काय घडलं?

Gangapur News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा; गंगापूरमध्ये कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

Abhijit Dipke: अभिजीत दिपकेंना दिलासा; सशर्त जामीन मंजूर करताना न्यायालयाने काय घातली अट?

Shivneri Kabaddi Tournament: अजिंक्य-साईच्या जोरावर रिजनल स्पोर्ट्स बोर्डाची तिसऱ्या फेरीत धडक, माटुंगा वर्कशॉपचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT