pmpml sakal
पुणे

PMPML : वाघोली बस टर्मिनल ; असुविधांचे आगार

केसनंद फाट्यावरील पी एम पी एल चे बस टर्मिनल प्रवाशांसाठी असुविधेचे तर आहेच

सकाळ वृत्तसेवा

वाघोली : केसनंद फाट्यावरील पी एम पी एल चे बस टर्मिनल प्रवाशांसाठी असुविधेचे तर आहेच. मात्र आता ते महिला प्रवाशांसाठी असुरक्षितही झाले आहे. त्या परिसरात चक्क दारूचा अड्डाही चालतो. खाजगी वाहतूक दारांची अरेरावी वेगळी. कचऱ्याची दुर्गंधी असते 24/7 तास. एवढी भयावह स्थिती असतानाही महापालिका व पी एम पी एल मात्र सुस्त आहे. दहा दिवसात याबाबत महापालिका व पी एम पी एल ने सुविधे बाबत काही हालचाल न केल्यास बसेस येऊ न देण्याचा व आंदोलन करण्याचा निर्णय लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

काही वर्षांपूर्वी महापालिकेने पी एम पी एल बस टर्मिनल साठी ही जागा घेतली. येथे सुसज्ज टर्मिनल उभारण्याची घोषणाही केली. मात्र सगळा फुसका बारच ठरला. साध्या सुविधाही महापालिका व पी एम पी एल ला देता आल्या नाही. यामुळे कर्मचारी व प्रवासी यांचे हाल होतात. तेथील जागेचे डांबरीकरण अथवा काँक्रीटीकरण ही करता आले नाही.

त्यामुळे धुळीचा त्रास सर्वांना सहन करावा लागत आहे. प्रवाशांसाठी स्वछताग्रह नाही. बस आल्यानंतर बस मागे प्रवाशांना पळावे लागते. आता तर दारूचा अड्डाच सुरू आहे. ते ही पावलावर असलेल्या पोलीस चौकी शेजारी. विजेची पुरेशी व्यवस्था नाही. कोणते माहिती फलक नाही. केवळ उत्पन्न मिळविण्याचे काम पी एम पी एल करीत आहे. याबाबत पी एम पी एल चे संचालक ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

" महापालिका व पी एम पी एल दोन्ही प्रशासन सुस्त आहे. त्यांना हलविण्याशिवाय आता पर्याय नाही -

- आमदार अशोक पवार

" केवळ उत्पन्न घेऊ नका. सांगितल्याप्रमाणे सुविधा द्या अन्यथा बसेस फिरकू देणार नाही. -राजेंद्र सातव, माजी उपसरपंच, वाघोली

" सुसज्ज टर्मिनल उभारण्याची घोषणा गेली कुठे. साध्या सुविधाही न देणे म्हणजे खूपच क्लेशदायक. आता या विरोधात जन आंदोलनाशिवाय पर्याय नाही -

- ज्ञानेश्वर कटके, माजी जिल्हा परिषद सदस्य.

" केवळ वापरासाठी गायरान जागा घेता. त्या मग सुविधाही पुरविल्या पाहिजे. प्रवाशांचे खूप हाल होतात. या विरोधात बस टर्मिनल जागेत उपोषण करणार. -

- रामदास दाभाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य.

" प्रवाशांचे एवढे अंत पाहू नये. त्यातून पी एम पी एल ला उत्पन्न मिळते. मग सुविधा द्यायला काय होते. पी एम पी एल विरोधात आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाही -

- शांताराम कटके, माजी उपसरपंच.

आकडेवारी बोलते

  • वाघोलीतून जाणारे बस मार्ग -- 15

  • दररोजची प्रवासी संख्या -- 40 ते 50 हजार

  • दररोजचे उत्पन्न -- सुमारे 10 ते 11 लाख.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPO Alert: NSE सह 5 IPO येणार! कोणता IPO देऊ शकतो सर्वाधिक Listing Gain? NSE IPO चा GMP किती?

सारखेनंतर आता ताटातली पोळीही महाग; एका महिन्यात गव्हाच्या दरात तब्बल २०० रुपयांची वाढ

Ganesh Chaturthi 2026: आपण गणपती बाप्पा म्हटलं की ‘मोरया’ का म्हणतो? या जयघोषामागे आहे एका गणेशभक्ताची कहाणी

Marathi News Live Updates : भुसावळमध्ये संत गाडगेबाबा कॉलेजच्या बाप्पाची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या चरणांशी उंदीर का असतो? उंदीर मामा कसा बनला गणपती बाप्पाचे वाहन? जाणून घ्या रंजक कथा!

SCROLL FOR NEXT