पुणे

साडेआठ लाखांच्या सिगारेट चोरीचा छडा

CD

वाघोली, ता. ३१ : वाघोली येथील आर्यन प्लॅस्टिक या दुकानाचे शटर उचकटून साडेआठ लाखांच्या सिगारेटच्या बॉक्सची चोरी केल्याप्रकरणी गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने ठाणे जिल्ह्यातून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एकूण दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पुणे पोलिस याचा तपास करत असताना दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक दोनने सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केल्यानंतर आरोपी चारचाकीतून चोरीचा माल घेऊन गेल्याचे स्पष्ट झाले. पुणे-पिंपरी चिंचवड हद्दीतील सुमारे ११५ कॅमेऱ्यांचे फुटेज व महामार्गावरील टोलनाक्यांची पडताळणी केल्यानंतर आरोपी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-मानपाडा परिसरात फिरत असल्याचे आढळले. गुप्त बातमीदारांमार्फत चालक, मालक यांची माहिती मिळवून प्रथम चारचाकी वाहनचालक वसीम इब्रार खान (वय ३८, रा. मुंब्रा, जि. ठाणे) यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून प्रत्यक्ष चोरी करणारे इतर दोन आरोपी साहिल मोजालिन पटेल (वय ३२, रा. डोंबिवली, ठाणे) आणि इम्तियाज लियाकत घोडके (वय ४५, रा. सृष्टी विहार, ठाणे) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी चोरीचा माल कल्याण शिळरोड येथील एक्सप्रिया मॉल समोरील पानशॉपच्या मालकाला विकल्याचे सांगितले. त्या ठिकाणाहून दोन लाख रुपये किमतीचे सिगारेट जप्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

फेक नॅरेटिव्हचा आरोप, राहुल गांधींवर निशाणा अन् CJPचा नवा अर्थ; फडणवीसांच्या भाषणात काय काय?

Hockey: भारत आठव्या स्थानावर राहिल्याने हॉकी इंडियाचे अध्यक्ष नाराज; विश्वचषकातील कामगिरीवर दिलीप तिर्की म्हणाले, “मीही खूश नाही”

Railway Reservation : गणपतीसाठी १.१७ लाख प्रवाशांचे आरक्षण पूर्ण; मध्य रेल्वेच्या २६२ विशेष गाड्या, सावंतवाडी रोडसाठी सर्वाधिक ११२ सेवा

कुख्यात ड्रग्स तस्कर अमजद पठाणच्या मुलाचं भयंकर कृत्य, विद्यार्थ्यावर थेट तलवारीने वार; कल्याणमधील नामांकित कॉलेजजवळ रक्तरंजित थरार

जंतर-मंतर CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घेण्यासाठी सरकारची सुप्रीम कोर्टात धाव; काय आहे अनुच्छेद 142?

SCROLL FOR NEXT