wagholi pune two wheeler accident two killed hospital police esakal
पुणे

Pune Accident News : वाघोलीत दुचाकींची समोरासमोर धडक, दोघांचा मृत्यू

मद्यधुंद दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Pune News : मद्यधुंद दुचाकीस्वाराने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना नगर रस्त्यावर वाघोली येथील गगन अधिरा सोसायटीजवळ घडली.

राहुल मोहन डुकळे (वय १९, रा. गायरान गोरेवस्ती, वाघोली) आणि रावसाहेब सिद्धाजी माने (वय २१, रा. लोणीकंद) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस कर्मचारी अमोल बबन गिरमे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून मृत दुचाकीस्वार राहुल डुकळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार राहुल डुकळे त्याच्या मित्रासह वाघोली येथील भावडी रस्त्यावरून सोमवारी रात्री दहाच्या सुमारास जात होता. या वेळी भरधाव दुचाकीने समोरून येणाऱ्या डिलिव्हरी बॉय रावसाहेब मानेला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणासह तिघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान डुकळे आणि माने या दोघांचा मृत्यू झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

FIFA World Cup: आधी संघाचा पराभव अन् पत्रकार परिषदेत कोचला मिळाली वडिलांच्या निधनाची बातमी; Video

Escort Allowance Scheme: शाळेत येण्या-जाण्यासाठी मिळणार सरकारी भत्ता; दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी UP सरकारची संवेदनशील योजना

Latest Marathi News Live Update : रायगडमध्ये NDRF दाखल; पूर-दरड संकटासाठी बचाव पथक सज्ज

SCROLL FOR NEXT