पुणे

ट्रेलरचालकाला धमकावून लुटणारा वाघोलीत जेरबंद

CD

वाघोली, ता. १७ : बांधकाम प्रकल्पावर साहित्य खाली करण्यासाठी आलेल्या ट्रेलरचालकाला धमकावून त्याच्याकडून १० हजार ५०० रुपये जबरदस्तीने घेतल्याचा प्रकार वाघोलीत घडला. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालक विठ्ठल गर्जे (रा. बीड) यांच्या फिर्यादीवरून वाघोली पोलिसांनी नवनाथ रिकामे (रा. आव्हाळवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्जे हे नाथकृपा रोडलाईन्स ॲण्ड स्टील सप्लायर्स या कंपनीत ट्रेलर चालक म्हणून काम करतात. स्टीलचा माल घेऊन येथील बांधकाम प्रकल्पावर गेले असता रिकामे याने ‘आपण या परिसरातील भाई असून, गुंडांशी ओळख असल्याचे’ सांगत प्रत्येक गाडीमागे पाच हजार रुपये देण्याची धमकी दिली. भीतीपोटी गर्जे यांनी त्याला दोन वेळा प्रत्येकी पाच हजार रुपये दिले. त्यानंतर १० सप्टेंबर रोजी गर्जे हे स्टील घेऊन बांधकाम जागेवर गेले असता त्याने पुन्हा पाच हजार रुपयांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिल्यावर त्याने चालकाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच चालकाकडील १० हजार ५०० रुपये जबरदस्तीने घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या घटनेनंतर गर्जे यांनी वाघोली पोलिसांत तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Exam Latest Update : ...अखेर राज्यसेवा 2025 च्या मुलाखती ढकलल्या पुढे; नवी तारीख काय? मुख्य परीक्षेबाबत अद्यापही अस्पष्टता!

Rekha Gupta Organ Donation : पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी रेखा गुप्तांचा मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प; नागरिकांनाही आवाहन

आमचे मार्ग आता जुळत नाहीत! Prithvi Shaw अन् आकृती अगरवाल यांचा वेगळा होण्याचा निर्णय; क्रिकेटपटूच्या पोस्टची चर्चा...

लग्नानंतर स्वयंपाक शिकली मेघना एरंडे; म्हणाली- माहेरची आणि सासरची लोकं गणेशोत्सवात आमच्या घरी येतात आणि...

Latest Marathi News Update : NTA कडून वर्षभरातील परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रक जाहीर

SCROLL FOR NEXT