Wagholi Wagheshwar Temple sakal
पुणे

Wagholi Wagheshwar Temple : वाघोलीतील वाघेश्वर मंदिरात हर हर महादेवचा जयघोष; हजारो भाविकांनी घेतले दर्शन

पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त वाघोलीतील वाघेश्वर मंदिरात हर हर महादेवचा जयघोष करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

वाघोली - पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त वाघोलीतील वाघेश्वर मंदिरात हर हर महादेवचा जयघोष करण्यात आला. दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शन घेतले. मंदिर फुलांनी आकर्षक सजविण्यात आले होते.

पुणे नगर महामार्गालगत असणारे वाघेश्वर मंदिर हे पुरातन कालीन मंदिर आहे. मंदिराच्या बाजूला तळे आहे. सकाळ पासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. रस्त्यापर्यंत रांग लागली होती. मंदिराला प्रवेश द्वारपसून फुलांनी आकर्षक सजविले होते. अधून मधून पावसाच्या सरी पदात होत्या. तरी भाविक रांगेत दर्शनासाठी उभे होते. या भाविकांना संतोष व संदीप जाधव कुटुंबियांच्या वतीने प्रसाद वाटप करण्यात आला. भाविकांनी रांगेत प्रसादाचा लाभ घेतला.

मंदिराबाहेर अनेक दुकाने थाटण्यात आली होती. तेथे खरेदीचा व तळ्यात बोटिंग चां आनंद भाविकांनी लुटला. सुमारे ७० लाख रुपये खर्चुन मंदिराच्या वज्रलेपाचे काम पूर्ण करण्यात आले आहे. तसेच सात गायमुख, रेलिंग, वीज रोधक यंत्र आदी कामे नुकतीच करण्यात आल्याची माहिती वाघोली विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव यांनी दिली.

भाविकांनी दक्ष राहावे

गर्दीचा फायदा घेवून अंगातील दागिने चोरून नेण्याच्या घटना घडतं आहे. अशीच घटना सोमवारी मंदिर परिसरात घडली. एका महिलेचे गळ्यातील गंठण चोरीला गेले. भाविकांनी अंगावरील दागिने दिसू नये याची काळजी घ्यावी तसेच दक्ष राहावे. असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र सातव व लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRPF exam controversy ८५ प्रश्न कॉपी पेस्ट! SRPF भरतीला स्थगिती, पोलीस उपमहानिरीक्षकांनी दिले चौकशीचे आदेश

DC vs CSK Live: चेन्नईच्या गोलंदाजांची दमदार कामगिरी, पण एक झेल सोडणे पडले महागात! त्रिस्तान स्तब्स-समीर रिझवीने झोडले...

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार प्रकरणी १५ दिवसांत आरोपपत्र दाखल होणार

Latest Marathi News Live Update : अजित डोवाल यांनी व्हिएतनामचे सरचिटणीस आणि राष्ट्रपती 'तो लाम' यांची घेतली भेट

Rohit Sharma च्या कमबॅकमागे दोन 'unsung heroes'! हिटमॅनने मानले आभार; जाणून घ्या कोण ते? एक आहे अभिनेत्रीचा पती अन्...

SCROLL FOR NEXT