पुणे

''वाई सांस्कृतिक महोत्सव-२०२६'' या उपक्रमांचा प्रारंभ.

CD

सांस्कृतिक महोत्सवास
वाईत मिरवणुकीने प्रारंभ

वाई, ता. २५ : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक वाईत आज पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व महिला सक्षमीकरणासाठी आयोजित ‘वाई संस्कृतिक महोत्सव - २०२६’ या कला व संस्कृतीच्या उत्सवाची भव्य मिरवणुकीने सुरुवात झाली. नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या संकल्पनेतून आकारास आलेल्या या महोत्सवात कला, नृत्य, अभिनय आविष्कार तसेच खाद्य संस्कृती अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे.
आज ११ परिसरातील गड-किल्ल्यावरून आणलेली पवित्र माती व पंचगंगेच्या जलपूजनाने शहरातून महागणपती घाट ते शिवतीर्थ या मार्गे भव्य मिरवणुकीने सुरुवात झाली. या मिरवणुकीमध्ये प्रशासन अधिकारी साईनाथ वाळेकर, शहरातील सर्व शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक विविध चित्ररथांसह सहभागी झाले होते. या वेळी शिवतीर्थावर नगराध्यक्ष अनिल सावंत व सरिता सावंत यांच्या हस्ते पवित्र मृदा व पंचगंगेच्या जलाचे पूजन झाले. या उपक्रमातून वाईची सांस्कृतिक ओळख राज्यभर होऊन शहरात पर्यटन व रोजगाराची विविध दालने उपलब्ध होतील. हा सांस्कृतिक महोत्सव आयोजनाचा हेतू असल्याचे श्री. सावंत यांनी स्पष्ट केले.
महोत्सवात सायंकाळी चार वाजता खाद्यसंकृती दालनाचे उद्‌घाटन झाले. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता क्रांती नाना मळेगावकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम झाला. उद्या (सोमवार) सकाळी आठ वाजता नगराध्यक्ष सावंत यांच्या हस्ते ध्वजवंदन होणार असून, याप्रसंगी शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजिला आहे. सायंकाळी सहा वाजता स्थानिक कलाकारांचा कला आविष्कार व तालुक्यातील विशेष कामगिरी केलेल्या विविध क्षेत्रातील नागरिकांचा सन्मान आयोजिला आहे. मंगळवारी (ता. २७) फोक प्रबोधन हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष घनश्याम चक्के, नगरसेवक विजय ढेकणे, प्रसाद बनकर, संग्राम जगताप, भारत खामकर, अजित शिंदे, गुरुप्रसाद चव्हाण, शैलेंद्र देवकुळे, अपर्णा जमदाडे, केतकी पाटणे, पद्मा पाडळे, नूतन मालुसरे, ज्योती गांधी, जागृती पोरे, दीपाली सावंत, तर महोत्सव समितीचे पदाधिकारी प्रवीण जाधव, नीलेश मोरे, प्रणव गुजर, परेश लाड, अविनाश रांजणे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------
छायाचित्र ओळी-
WAI26B07507, WAI26B07508
वाई : सांस्कृतिक महोत्सवानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत सैन्य दलातील कसरती सादर करताना विद्यार्थी, विद्यार्थिनी. त्या वेळी नगराध्यक्ष अनिल सावंत, घनश्याम चक्के, भारत खामकर, अजित शिंदे, प्रसाद बनकर आदी. (भद्रेश भाटे : सकाळ छायाचित्रसेवा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT