पुणे

वाई:-किसन वीर महाविद्यालयात राज्यस्तरीय '' इकॉनॉमिक्स ऑलिम्पियाड '' स्पर्धा उत्साहात संपन्न

CD

वाईत इकॉनॉमिक्स ऑलिंपियाड स्पर्धा उत्साहात

वाई, ता. ३ : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात अर्थशास्त्र विभागाच्या वतीने इकॉनॉमिक्स ऑलिंपियाडही राज्यस्तरीय स्पर्धा नुकतीच पार पडली. या स्पर्धेत सर्वाधिक गुण मिळवून किसन वीर महाविद्यालयातील विद्यार्थिनी सानिया काझी हिने अमर्त्य सेन ट्रॉफी पटकावली.
या अंतर्गत सर्व शाखांतील विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखन, भित्तिपत्रक प्रदर्शन, मॉडेल सादरीकरण, रांगोळी स्पर्धा, रिसर्च पेपर सादरीकरण, तसेच इकॉनॉमिक्स टॅलेंट सर्च क्वीझ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राज्यभरातील १८८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. स्पर्धेचे उद्‍घाटन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय कुंभार यांच्या हस्ते झाले. स्पर्धेचे बक्षीस वितरण नंदकुमार परापकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. विविध स्पर्धांचे परीक्षण प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे, डॉ. राणी शिंदे, डॉ. राबाडे, डॉ. एस. पी. कांबळे, डॉ. कवडे, प्रा. रेश्मा मुलाणी व प्रा. राहुल तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विभागप्रमुख डॉ. राजेश गावित, समन्वयक प्रा. मेघा शिर्के, डॉ. प्रेमा यादव, प्रा. मनोहर मंगवडे यांनी प्रयत्न केले. प्रा. सुमती कांबळे व प्रा. राहुल तायडे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, तसेच विद्यार्थी उपस्थित होते.
------
07531
वाई : राज्यस्तरीय इकॉनॉमिक्स ऑलिंपियाड स्पर्धेतील विजेत्यांसमवेत प्रमुख मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story: पहिल्यांदा IPS, पण स्वप्न IASचं! किराणा दुकानदाराच्या मुलीने दुसऱ्या प्रयत्नात कसं मिळवलं यश?

Maharashtra Budget 2026 : बळिराजा लाडका! दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ, बहिणींना ओवाळणी कायम

Donald Trump Fuel Price Warning : ‘इंधन दरवाढीची फिकीर नाही’ डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट जगाला दिला इशारा

Latest Marathi News Live Update : कामठीत मोकाट कुत्र्यांचा कहर, एका दिवसात १४ नागरिकांना चावा

Maharashtra Heatwave Alert : राज्यात सूर्याचा प्रकोप! अमरावतीने ओलांडली चाळीशी; पुढील 24 तास तुमच्यासाठी का आहेत महत्त्वाचे?

SCROLL FOR NEXT