पुणे

वाई:- सुरूर–पोलादपूर रस्त्याच्या संथ व निकृष्ट कामाविरोधात वाईकरांचा आंदोलनाचा पवित्रा.

CD

रस्त्याच्या कामाबाबत वाईकर आक्रमक

उद्या आंदोलनाचा बैठकीत इशारा; ठेकेदाराची मनमानी, प्रशासनाचे दुर्लक्ष

वाई, ता. ९ : गेल्या दीड वर्षापासून सुरूर- वाई- पोलादपूर मार्गावरील सुरूर ते पसरणी घाट, तसेच वाई- मांढरदेव रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. ठेकेदारांची मनमानी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पाचगणी व महाबळेश्वर पाठोपाठ आता वाईकरांनी बुधवारी (ता. ११) रास्ता रोको, मोर्चा व ‘वाई बंद’ आंदोलनाचा निर्णय घेतला आहे.
येथील पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत संतप्त नागरिकांनी रस्त्याच्या प्रश्नावरून ठेकेदार व प्रशासनावर जोरदार टीका केली. यावेळी मंचावर यशवंत जमदाडे, ॲड. दीप्ती पिसाळ, हेमंत येवले, प्रशांत डोंगरे, सुरेश कोरडे व ॲड. विजयसिंह पिसाळ उपस्थित होते. रोहित गाढवे, अशोक लोखंडे, तेजपाल वाघ, सागर मालुसरे, जितेंद्र पिसाळ, पद्मा जाधव- पाडळे, केतकी पाटणे, अपर्णा जमदाडे, डॉ. जागृती पोरे, दीपाली सावंत, ज्योती गांधी, नूतन मालुसरे, प्रसाद बनकर, सचिन सावंत यांच्यासह अनेक नागरिकांनी बैठकीत विचार मांडले.
या रस्त्याची काम करणारे ठेकेदार तांत्रिक नियमांची पायमल्ली करीत असल्याचा आरोप करण्यात आला. नियमानुसार अत्याधुनिक पेव्हर मशिनचा वापर बंधनकारक असताना प्रत्यक्षात फावड्याने आणि लाकडी पट्ट्यांनी काँक्रिट टाकले जात असून, कामाच्या ठिकाणी प्रशिक्षित अभियंता नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. देखरेख करणारी एजन्सीही प्रत्यक्ष साइटवर दिसत नसल्याची तक्रार नागरिकांनी केली.
रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. जनावरांना चारा खाणेही कठीण झाले असून, रस्त्यालगतच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. हॉटेल व्यावसायिक, टपरीधारक आणि छोटे व्यापारी आर्थिक संकटात सापडले आहेत. एमआयडीसीमध्ये कामावर जाणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकी वाहनांचीही मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. एसटीचे मार्ग बदलल्याने प्रवाशांना वाढीव भाडे आणि अतिरिक्त वेळेचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. याबाबत तक्रार केल्यानंतर ठेकेदारांकडून स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पोलिस प्रशासनाचा दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, अपघाताचा धोका वाढला आहे.
रस्त्याचे काम किमान ५० वर्षे टिकेल अशा दर्जेदार पीक्यूसी पद्धतीने करावे. धुळीवर नियंत्रणासाठी दररोज सकाळ- संध्याकाळ पाणी मारावे. कामाच्या ठिकाणी तज्ज्ञ अभियंते २४ तास उपस्थित ठेवावेत. कामाचा दर्जा सुधारल्याशिवाय ठेकेदाराचे बिल रोखावे, दोषींवर गुन्हे दाखल करण्याची मागणी यावेळी नगराध्यक्ष सावंत यांनी केली.
-----------------------------
बैठकीकडे पाठ

बैठकीला नगराध्यक्षांसह भाजपचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. मात्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री भाजपचे असल्याने त्यांच्याविरोधात उघडपणे कोणी बोलण्याची हिंमत दाखवली नाही, तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या काही नगरसेवकांनी व स्थानिक नेत्यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्यानेही नाराजी व्यक्त करण्यात आली.
-------------------------------
07681
वाई : रस्त्याच्या काम संदर्भातील बैठकीत उपस्थित अनिल सावंत, त्या वेळी यशवंत जमदाडे, दीप्ती पिसाळ, विजय ढेकाने, प्रशांत डोंगरे, सुरेश कोरडे आदी.
------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

थलपतीला विजय मिळाला पण सत्ता नाही! मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी कुणाशी हातमिळवणी करणार? राज्यात त्रिशंकू स्थिती

Mamata Banarjee : ममता बॅनर्जींचा पराभव, सत्ता अन् आमदारकीही गेली; भाजपच्या सुवेंदू अधिकारी यांचा मोठा विजय

Tamil Nadu Election: विजयच्या पक्षात भावनिक कथा! तिकीट मिळाल्यावर रडलेला ड्रायव्हरचा मुलगा जिंकला की हरला? उमेदवाराची कहाणी चर्चेत

मला दाखव, काय लिहिले आहेस? Raghu Sharma ने विकेट घेताच खिशातून पेपर काढला, सूर्यकुमार यादव वाचायला गेला; भावनिक संदेश...

Pinarayi Vijayan: १० वर्षांच्या सत्तेनंतर मोठी पडझड! LDF पक्षाचा दारुण पराभव, मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, UDF ची दमदार एंट्री

SCROLL FOR NEXT