Walchandnagar Company Motor in Test of Gaganyaan Mission science and technology marathi news pune  sakal
पुणे

Gaganyaan Mission : गगनयान माेहिमेच्या चाचणीमध्ये वालचंदनगर कंपनीची मोटर...

आजच्या चाचणीमध्ये वालचंदनगर कंपनीने तयार केलेल्या क्रू एस्केप सिस्टीम जेटीसनिंग मोटर (सीजेएम) विकसित करुन तयार केली

राजकुमार थोरात - सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनी भारताच्या महत्वकांक्षी गगनयान मोहिमेची महत्वाची उपकरणे तयार करीत असून आजच्या चाचणीमध्ये ही वालचंदनगर कंपनीने तयार केलेली क्रू एस्केप सिस्टीम जेटीसनिंग मोटर वापरण्यात आली . गगनयानाची चाचणी यशस्वी झाली असल्याची माहिती वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी व व्हाईस प्रेसिडेंट धीरज केसकर यांनी दिली.

भारतीय अवकाश संशोधन संस्था गगनयान मोहिमेची तयारी करीत आहेत. यासंदर्भातील ‘ उड्डाण रद्दची ’ एक चाचणी आज शनिवार (ता.२१) रोजी घेण्यात आली. या चाचणीमध्ये यानाच्या उड्डानानंतर आपत्कालीन परिस्थितीत यानातील अंतरिक्ष क्रू एस्केप सिस्टीम द्वारे सुरक्षित बाहेर पडू शकतात. आजच्या चाचणीमध्ये वालचंदनगर कंपनीने तयार केलेल्या क्रू एस्केप सिस्टीम जेटीसनिंग मोटर (सीजेएम) विकसित करुन तयार केली आहे.

गगनयान माेहिमेसाठी वालचंदनगर कंपनीने एचएस २०० सॉलिड रॉकेट बूस्टर सह इतर महत्वाची उपकरणे विकसित करुन त्याचे टेस्टिंग करत आहेत. गगनयानाच्या पहिल्या चाचणीच्या यशाबद्दल वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी चिराग दोशी,व्हाईस प्रेसिडेंट धीरज केसकर यांनी सर्व कामगारांचे,इंजिनिअरचे कौतुक केले.

तसेच कंपनीमध्ये पेढे वाटून आनंदउत्सव साजरा करण्यात आला.भारतीय अवकाश संशोधन संस्थेशी वालचंदनगर कंपनी गेल्या पाच दशाकापासून यशस्वीपणे काम करीत आहेत. चांद्रयान - १, चांद्रयान-२,चांद्रयान - ३, मंगळयान तसेच आदित्य एल- १ माेहिमेमध्ये वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग होता.या मोहिमेसाठी कंपनी हेवी बुस्टर्स मोटर्स सह इतर महत्वाची उपकरणे तयार केली होती. याव्यतिरिक्त कंपनी देशउभारणीसाठी महत्वाच्या असणाऱ्या अणुउर्जा,डिफेन्स,एरोस्पेस,मिसाईल च्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपा आमदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकीय वर्तुळात खळबळ, नेमकं काय घडलं?

Ambulance Policy: रुग्णांसाठी मोठा दिलासा! महाराष्ट्रात नवे अ‍ॅम्ब्युलन्स धोरण लागू; ४ अ‍ॅप्सशी जोडणार, जाणून घ्या नवी प्रणाली

100 मुलांचा बाप! रशियाकडून दहशतवादाला मदत केल्याचा आरोप; आजही 15 कोटी भारतीय वापरतात त्याचे अॅप, नेमकं प्रकरण काय?

Amit Shaha : अमित शहा यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान २३० काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड; पोलिसांवर अधिकार उल्लंघनाचा आरोप

Latest Marathi News Live Update : पुण्यात पॉवर सब-स्टेशन प्रकल्पाच्या कार्यालयाची अज्ज्ञातांकडून तोडफोड

SCROLL FOR NEXT