पुणे

दौंडजमधील केबल चोऱ्यांमुळे शेतकरी हवालदिल

CD

वाल्हे, ता. १८ : आधीच दुष्काळजन्य परिस्थितीमुळे पाण्यासाठी धडपड करावी लागत असतानाच विहिरीवरील विद्युत मोटारींच्या केबल चोरीच्या घटनांनी दौंडज (ता. पुरंदर) परिसरातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. महिनाभरात दुसऱ्यांदा केबल चोरीची घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
चोरटे केबलवरील प्लॅस्टिकचे आवरण जाळून आतील तांबे विकत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी सखोल तपास करून
तांबे खरेदी करणाऱ्यांचाही शोध घ्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.
दौंडज परिसरात मागील महिन्यात पाच ते सहा शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारींच्या केबल चोरीला गेल्या होत्या. या घटनेचा तपास अद्याप लागलेला नसतानाच सोमवारी (ता. १६) पुन्हा चोरट्यांनी हात साफ केला. प्रताप इंदलकर, नामदेव इंदलकर, अशोक इंदलकर, संतोष माळवदकर, रवींद्र माळवदकर आणि मानसिंग माळवदकर यांच्या विहिरीवरील हजारो रुपये किमतीच्या विद्युत केबल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्या. या चोरीप्रकरणी ग्रामस्थांनी वाल्हे पोलिस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती संदीप इंदलकर यांनी दिली. केबल चोरी झाल्याने मोटारी बंद पडत असून पिकांना पाणी देण्याच्या कामातही अडथळे निर्माण होत आहेत. चोरटे केबलमधील प्लॅस्टिकचे आवरण जाळून त्यातील तांबे वेगळे करतात आणि त्याची विक्री करतात, असे प्रताप इंदलकर यांनी सांगितले.

नवीन केबल खरेदीसाठी हजारोंचा खर्च
एकीकडे पाण्याची टंचाई, दुसरीकडे शेतीसाठी आवश्यक असलेल्या मोटारींच्या केबल चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट उभे राहिले आहे. नवीन केबल खरेदी करण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागत असून पिकांना पाणी देण्याचे नियोजनही विस्कळित होत आहे. याप्रकरणी ग्रामस्थांनी वाल्हे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ऐतिहासिक भेट! चीनमध्ये पहिल्यांदाच एकत्र आले ट्रम्प, पुतिन अन् शी जिनपिंग; बैठकीत काय चर्चा होणार?

Devuthani Ekadashi Do's & Don'ts: देवउठणी एकादशीला चुकूनही करू नका 'या' ६ चुका; व्रत करणाऱ्यांनी लक्षात ठेवा महत्त्वाचे नियम!

Ball Tampering 2018: कमिन्ससह स्टार्कही अडकणार? ज्या बॅनक्रॉफ्टने सँडपेपरचा वापर केला, त्यानेच अखेर केला मोठा गौप्यस्फोट

४ राशींचे नशीब चमकणार, वक्री शनी देणार मेहनतीचं फळ; अडकलेली कामंही पूर्ण होणार

Latest Marathi News Live Update : आयफोनच्या ईएमआयवरून वाद; मित्राची चाकूने वार करून हत्या

SCROLL FOR NEXT