पुणे

वाल्हे परिसरात जनगणनेला सुरुवात

CD

वाल्हे, ता. १७ : राज्यातील जनगणना मोहिमेला शनिवारी (ता. १६) प्रारंभ झाला असून, प्रशासनाने नियुक्त केलेले प्रगणक आता घराघरांत जाऊन नागरिकांची माहिती संकलित करीत आहेत. वाल्हे (ता. पुरंदर) येथे प्रगणक नागरिकांच्या घरी भेट देऊन घराची स्थिती, कुटुंबप्रमुखाची माहिती, पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत, प्रकाशाचा स्रोत, कुटुंबातील विवाहित जोडप्यांची संख्या तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा इतर प्रवर्गातील माहिती संकलित करत आहेत.
जनगणनेचा दुसरा टप्पा प्रत्यक्ष गृहभेटीद्वारे राबविला जात आहे. सन २०११ नंतर प्रथमच होत असलेल्या या जनगणनेकडे प्रशासनासह नागरिकांचेही लक्ष लागले आहे. दुसऱ्या टप्प्यातील गृहभेटीद्वारे घरगणना नोंदी करण्यास सुरुवात झाली असून १६ मे ते १४ जून या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
यंदा नागरिकांसाठी स्वगणनेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वगणना पूर्ण झाल्यानंतर संबंधितांना एसई क्रमांक देण्यात येणार आहे. तसेच, या वेळी २२ भाषांमध्ये प्रश्नावली उपलब्ध आहे. या प्रक्रियेत एकूण ३३ प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यंदाच्या जनगणनेत प्रथमच जातनिहाय नोंद केली जाणार आहे. त्यामुळे सामाजिक आणि शासकीय नियोजनासाठी महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध होणार असल्याचे प्रगणक नितीनकुमार पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT