पुणे

वालवड येथे 36 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

CD

PGR26B03409
अशोक जाधवर
---
वालवड येथे तरुणाची
गळफास घेऊन आत्महत्या
सकाळ वृत्तसेवा
पांगरी, ता. २९ : बार्शी तालुक्यातील वालवड येथील ३६ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतातील जनावरांच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (ता. २८) पहाटे उघडकीस आली. अशोक सुंदरराव जाधवर (वय ३६)असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सुंदरराव राजाराम जाधवर (वय ६०) यांनी दिलेल्या खबरीमध्ये म्हटले आहे की, अशोक जाधवर हा पत्नी आणि मुलांसह वालवड येथे राहतात. फिर्यादी सुंदरराव व त्यांची पत्नी शेतात राहात होते. मंगळवारी (ता. २७) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास अशोक यांनी आपल्या आई- वडिलांसोबत शेतातील घरी जेवण केले. त्यानंतर, मी गट नंबर ८१ मधील शेतातील जनावरांच्या शेडवर झोपायला जातो, असे सांगून अशोक हे घरून निघाले होते.
बुधवारी (ता. २८) पहाटे साडे पाचच्या सुमारास अशोक यांचे वडील सुंदरराव हे जनावरांची धार काढण्यासाठी आणि गोठा साफ करण्यासाठी शेडवर गेले होते. त्यावेळी त्यांना आपला मुलगा शेडच्या वरच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकताना दिसला.
वडिलांनी तातडीने दोरी सोडवून मुलाला खाली उतरवले. मात्र, तोपर्यंत अशोक यांचा मृत्यू झाला होता. याबाबत अकस्मात मृत्यूची नोंद झाली असून, पुढील तपास सहायक फौजदार प्रकाश मांजरे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Conflict : इराणचा युद्धबंदीच्या चर्चांना नकार ! अमेरिकेला ठाम इशारा – गरज असेपर्यंत युद्ध सुरूच राहणार

Islapur Fire Incident: ईस्लापूरमध्ये भीषण आग; हॉटेल, हार्डवेअर व शूज सेंटरचे लाखोंचे नुकसान

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Nashik Sharda Sanman: शारदानगरमध्ये ‘शारदा सन्मान पत्र’ प्रदान; महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव; कल्याण पाचांगणे

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT