पुणे

वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करा

CD

वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करा
धर्मादाय उपयुक्तांचे आदेश ः घनश्‍याम शेलार यांची माहिती
श्रीगोंदे, ता. १६ : येथील शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट या न्यासाची वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करण्याचे आदेश अहिल्यानगर येथील धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी दिले आहेत. ही नोंदणी रद्द करण्यासाठी दोन महिन्यांच्या आत वक्फ बोर्डाकडे अर्ज करण्याचे आदेश दिल्याची माहिती घनश्याम शेलार यांनी दिली.
शहरातील संत शेख महंमद महाराज देवस्थान हे सर्वधर्मियांचे श्रद्धास्थान असून, त्याची वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी घनश्याम शेलार यांनी गेल्यावर्षी अहिल्यानगर येथील धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडे अर्ज केला होता. त्यावर अर्जदार व दर्गाह ट्रस्टचे अध्यक्ष अमीन शेख यांच्या दोन्ही बाजूंनी युक्तिवाद करण्यात आला. याबाबत धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी शनिवार (ता.१५) आदेश दिले आहेत. त्यानुसार, शेलार यांचा अर्ज अंशतः मंजूर करण्यात आला आहे. शेख महंमद बाबा दर्गाह ट्रस्ट या न्यासाची वक्फ बोर्डाकडील पोखळीस्त नोंदणी रद्द करण्याबाबतचे आदेश न्यासाच्या विश्वस्तांना दिले आहेत. शिवाय, दोन महिन्यांच्या आतमध्ये वक्फ बोर्डाकडे अर्ज करणे आवश्यक असल्याचे त्यांनी आदेशात म्हटले आहे. न्यासाच्या नावाबाबतचे प्रकरण वरिष्ठ न्यायालयात प्रलंबित असल्याने त्या संदर्भातील अर्जदारांची मागणी तूर्तास अमान्य करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
यावेळी गोपाळ मोटे, पोपट खेतमाळीस, चंद्रकांत कटारिया, अनिल औटी, दादा औटी, सुदाम झुंजरूक, अशोक आळेकर, बाळासाहेब दुतारे, नवनाथ दरेकर, सतीश मखरे, सुधीर खेडकर आदी उपस्थित होते. दरम्यान, याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष अमीन शेख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
कोट
संत शेख महंमद महाराजांनी भागवत धर्माचा स्वीकार करून त्याचा प्रचार व प्रसार केला. साहित्य रचना केली. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे राष्ट्रीय प्रतीक मानल्या जाणाऱ्या या देवस्थानची वक्फ बोर्डाकडील नोंदणी रद्द करण्याचे आदेश झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या देवस्थानचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून त्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.
- घनश्याम शेलार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT