Manoj Naravane Sakal
पुणे

युद्ध हे दोन देशांमधील तणावामुळे निर्माण होते : लष्कर प्रमुख मनोज नरवणे

‘आपला देश सध्या मोठ्या आव्हानांना सामोरा जात आहे. कोरोना काळात देशाच्या उत्तरेकडील आणि उत्तरेकडील पश्चिम भागातील घडामोडींमध्ये वाढ झाली आहे.

प्रशांत पाटील

पुणे - ‘आपला देश सध्या मोठ्या आव्हानांना सामोरा जात आहे. कोरोना काळात देशाच्या उत्तरेकडील आणि उत्तरेकडील पश्चिम भागातील घडामोडींमध्ये वाढ झाली आहे. आपले सीमेवरील सैन्यदल त्याला सामोरे जाण्यासाठी खंबीरपणे सज्ज आहे. परंतु युद्ध हे फक्त दोन सैन्यांमधील नसून दोन देशांमधील तणावामुळे निर्माण झालेले असते, हे समजून घ्यायला हवे,’ असे मत लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केले.

भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतील (एफटीआयआय) दूरचित्रवाणी विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विभागाच्या इमारतीला पु. ल. देशपांडे यांचे नाव देण्यात आले. तसेच विभागातील दोन स्टुडिओंना पी. कुमार वासुदेव आणि प्रा. वसंत मुळे यांचे नाव देण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रम नरवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शिका सई पराजंपे, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, संस्थेचे संचालक भूपेंद्र कैंथोला आदी मान्यवर उपस्थित होते.

नरवणे म्हणाले, ‘एफटीआयआय हे ऑडिओ आणि व्हिज्युअल माध्यमातील सर्वोत्कृष्टतेचे केंद्र आहे. कला जीवन अधोरेखित करते, तर समाजाचे प्रतिबिंब चित्रपटातून उमटते. अनेक संवेदनशील विषय भारतीय चित्रपटातून आजवर मांडण्यात आले आहेत. चित्रपट आणि टिव्हीवरील मालिकांमधून प्रबोधन, जागृतीचे काम होते.’ यावेळी नरवणे यांनी एफटीआयआय आणि पुण्यातील आठवणींना उजाळा दिला.

कैंथोला म्हणाले, ‘एफटीआयआय हे चित्रपट आणि दूरचित्रवाणीची ‘आयआयटी’ आहे. संस्थेत चित्रपटाकडे केवळ मनोरंजन म्हणून पाहिले जात नाही. तर चित्रपटाला एक कला आणि कौशल्य म्हणून पाहिले जाते. पु. ल. देशपांडे यांचे एफटीआयआयशी वेगळेच नाते होते. त्यांची अनेक रेकॉर्डिंग संस्थेत झाली आहेत. एफटीआयआय म्हटलं की अनेक जण केवळ चित्रपटाविषयी बोलतात. परंतु संस्थेत दूरचित्रवाणीसंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. वेगवेगळे अभ्यासक्रम राबविले जातात. संस्थेत येऊन शिक्षण घेऊन न शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेने पुण्याबाहेर जाऊन शिक्षण द्यायला सुरवात केली आहे.’ डॉ. पटेल यांनी पु. ल. देशपांडे यांच्यासह एफटीआयआयमधील जुन्या आठवणींना उजाळा दिला.

‘चित्रपटांमध्ये सैन्य दलातील मोठ्या अधिकाऱ्यांची व्यक्तीरेखा चुकीच्या पद्धतीने रंगविली जाते. परिणामी सैन्य दलातील मोठ्या पदस्थ अधिकाऱ्याबाबत चुकीचे मत निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात चित्रपटांमध्ये असे प्रकार टाळले जातील,’’ अशी आशा लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कारच केले नाहीत; मृतदेह प्रिझर्व्ह करून ठेवला, मुंबईतील खळबळजनक घटना

Malvan Accident : दुचाकीच्या धडकेत भाजप नगरसेविकेसह चौघे जखमी, सरकारी दवाखान्यात एक्स रे मशीन बंद असल्याने संताप

LPG Cylinder Price: उद्यापासून गॅस सिलेंडर महागणार? महाराष्ट्रात आज कितीला मिळतो LPG, पाहा शहरनिहाय दर

Pradip Purnekar case: ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याच्या हत्येचा CCTV फुटेज समोर, ७ गोळ्या झाडल्याचा आवाज

Ayush Thite Organ Donation : सोलापूरच्या आयुषच्या हृदयाने रशियातील तीन वर्षांच्या चिमुकल्याला मिळणार नवजीवन; अवयवदानाने वाचणार चौघांचे प्राण

SCROLL FOR NEXT