nira 
पुणे

माउली, वारकऱ्यांनी अशी जपली नीरा स्नानाची परंपरा  

श्रद्धा जोशी

गुळुंचे (पुणे) : कोरोना संकटकाळ नसता तर आज नीरा (ता. पुरंदर) येथे संत ज्ञानेश्वरांच्या पादुकांना मोठ्या भक्तीभावात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत नीरा स्नान घातले गेले असते. मात्र, अनेक वर्षांची नीरास्नानाची परंपरा मोडू नये, याकरिता आज मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत माउलींच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात आले आणि माउली-माउलीच्या जयघोषाने अनेकांच्या मनाची घालमेल शांत झाली. 

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा आळंदी ते पंढरपूर पालखी सोहळा दरवर्षी आजच्याच दिवशी नीरा येथील नीरा नदीच्या दत्त घाटावर येत असतो. या वेळी दुपारच्या विसाव्यानंतर माउलींच्या पादुकांना नीरा स्नान घातले जाते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांमुळे गर्दी टाळण्याचे आवाहन प्रशासन करत आहे. या पार्श्वभूमीवर नीरा- पाडेगाव येथील काही भक्तांनी माउलींच्या प्रतिकात्मक पादुकांना नीरा नदीच्या पवित्र तिर्थामध्ये माउली माउलीच्या जयघोषात स्नान घातले. सुमारे 25 लोकांमध्ये हा नीरा स्नान सोहळा पार पडला व दुपारी दीडच्या दरम्यान फक्त पंधरा ते वीस मिनिटात हा सोहळा आटोपता घेण्यात आला. 

या दरम्यान माउलींच्या प्रतीकात्मक पादुकांना स्नान घालण्यात आले. विधिवत पूजा करून पांडुरंग, ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची आरती करण्यात आली. दीडशे ते पावणेदोनशे वर्षाची परंपरा असलेल्या या सोहळ्यात भाग न घेता आल्याने अनेकांचे अश्रू अनावर झाले. या वेळी सरपंच हरिश्चंद्र माने, विजय धायगुडे, शंकर मर्दाने, हभप दिलीप झगडे, शामराव धायगुडे, गजानन माने, टी. के. जगताप, बाळासाहेब दरेकर, विनायक दिक्षीत आदी उपस्थित होते.

माउली, इडा पीडा टळू दे - माउली, जग कोरोना संकटमुक्त होऊ दे व पुढील वारी मोठ्या भक्तीभावात व लाखो वारकऱ्यांच्या टाळ, मृदुंग, विणेच्या आवाजात व विठ्ठल नामाच्या जयघोषात सुरू होउ दे, असे साकडे अनेकांनी आज विठ्ठल चरणी घातले. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC: अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठोस धोरण ठरवा, ठाकरे गटाची मागणी

स्टार प्रवाहने केली एक दोन नाही तब्बल ६ नव्या मालिकांची घोषणा; २ कार्यक्रमही सोबतीला, ही आहेत नाव आणि कलाकार

Kalyan: इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन; घोड्यावरून मोर्चा काढत नागरिकांना मेलोडीचे वाटप

Latest Marathi News Live Update : एकतानगरी मधील नागरिकांचा आयुक्तांना घेराव

US-Iran Ceasefire Deal: 'होर्मुज'मध्ये शांतता आणि इराणसाठी 300 अब्ज डॉलरची गुंतवणूक; अमेरिका-इराणमध्ये शांतता कराराचा नवीन मसुदा

SCROLL FOR NEXT