पुणे

कोल्हापूरः मांगलेच्या मिथिलेश पाटील यांची गाय, कोथळीच्या अमोल गंगाई यांची म्हैस ‘वारणा श्री’

CD

मांगलेची गाय, कोथळीची म्हैस ‘वारणा श्री’

संघाच्या प्रदर्शनात ३०० हून अधिक जनावरांचा सहभाग

ॲग्रोवन वृत्तसेवा
वारणानगर, जि. कोल्हापूर : येथे जनावरांच्या प्रदर्शनात आयोजित स्पर्धेत मांगले (ता. शिराळा, जि. सांगली) येथील मिथिलेश पाटील यांची गाय, तर कोथळी (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) येथील अमोल गंगाई यांची म्हैस ‘वारणा श्री’ पुरस्काराची मानकरी ठरली.

सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या ११२ व्या जयंतीनिमित्त वारणा सहकारी दूध संघ आणि तात्यासाहेब कोरे पशुवैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जातिवंत जनावरांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. यावेळी झालेल्या स्पर्धेत गंगाई व पाटील यांच्या म्हैस व गायीची निवड करण्यात आले.

विजेत्यांना म्हैस गटात गंगाई यांना २५ हजार रुपये, तर गाय गटात पाटील यांना २१ हजार रुपये रोख व प्रशस्तिपत्र देऊन आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पाटील यांच्या गायीने सलग दुसऱ्या वर्षी हा मान मिळविला. प्रदर्शनात म्हैस गटात मुऱ्हा, मेहसाणा, पंढरपुरी व देशी, तर गाय गटात एच.एफ., जर्सी, खिलार, गीर यांसह विविध देशी जातींच्या ३०० हून अधिक जनावरांनी सहभाग घेतला.

क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विकास वास्कर यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. यावेळी संघाचे अध्यक्ष एच.आर. जाधव, उपाध्यक्ष ॲड. एन.आर. पाटील, कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर, निवृत्त सहाय्यक आयुक्त डॉ. व्यंकटराव घोरपडे, अधिष्ठाता डॉ. आनंद देशपांडे, डॉ. अविनाश कदम, डॉ. विश्वासराव मोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. जे.बी. पाटील यांनी केले. एच.आर. जाधव यांनी आभार मानले.

---- कोट ----
‘‘वारणा दूध संघामार्फत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्याबरोबरच परिसरात जातिवंत जनावरांची पैदास वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भविष्यात जातिवंत जनावरांच्या खरेदी-विक्रीचे केंद्र वारणा परिसरात निर्माण करण्याचा मानस आहे.’’
- आमदार डॉ. विनय कोरे

--- फोटो B08217 ----
वारणानगर, जि. कोल्हापूरः जातिवंत जनावरांच्या प्रदर्शनात मिथिलेश पाटील, व अनोल गंगाई या विजेत्यांना पुरस्कार वितरण करताना विनय कोरे. समवेत एच. आर. जाधव, एन. आर. पाटील, सुधीर कामेरीकर आदी मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahanadi Coalfields IPO: Jio नंतर आता सरकारी कंपनीचा IPO करू शकतो मालामाल! GMP किती, एका लॉटसाठी किती पैसे लागणार?

IND vs NZ: पहिल्या कसोटीत कोण IN अन् कोण OUT? शुभमन गिलच्या Playing XI मध्ये बुमराह, पंत, जुरेल कोणाला संधी? कशी असेल भारताची Playing XI

Latest Marathi News Update : राज्यात दुष्काळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर दोन राज्यातील मेंढपाळांमध्ये मोठा तणाव

"ही दोस्ती तुटायची नाय" सुमीत राघवनने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंसोबत धरला ठेका, व्हिडिओ पाहून नेटकरी म्हणाले...

Earthshot Prize 2026: पृथ्वी वाचवण्यासाठी प्रिन्स विल्यम यांचा खास उपक्रम! काय आहे अर्थशॉट प्राइज?

SCROLL FOR NEXT