Ward of three members Pune Municipal Corporation election Search for office for election sakal
पुणे

पुणे महापालिकेच्या निवडणूकीसाठी कार्यालयाचा शोध!

पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर आता प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयनिहाय निवडणूक कार्यालय सुरू करण्यासाठी इमारत शोध घेऊन तेथे सर्व अत्यावश्‍यक सुविधा आहेत का याची पाहणी करण्याचे आदेश निवडणूक शाखेने दिले आहेत. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत तीन सदस्यांचा प्रभाग आहे. त्याची प्रभाग रचना व नकाशे जाहीर झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ज्या भागात पावसाळा कमी असतो तेथे लगेच निवडणूक घ्यावी व पावसाचे प्रमाण जास्त आहे तेथे पावसाळ्यानंतर निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. पुणे शहरात पावसाचे प्रमाण जे जास्त असते, एकदा पाऊस सुरू झाला की लवकर उघडीप मिळत नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या निवडणूका सप्टेंबर नंतरच होण्याची शक्यता आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुण्यातील निवडणुकांचे वेळापत्रक निश्‍चीत होईल, पण महापालिका प्रशासनाने निवडणूकपूर्व कामाची तयारी सुरू केली आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत समाविष्ट होणाऱ्या प्रभागानुसार तेथे त्यांचे निवडणूक कार्यालय सुरू केले जाते. निवडणुकीसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, प्रभाग निहाय मतदानकेंद्र निश्चित करणे याचे नियोजन केले जाते. त्यासाठी महापालिकेची इमारत किंवा शाळा या ठिकाणी कार्यालय सुरू केले जातील. त्याची पाहणी करून सर्व सुविधा आहेत की नाही याची खातरजमा करावी, आवश्‍यक ठिकाणी कामे करून घ्यावेत अशा सूचना निवडणूक शाखेने क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: मुंबईतील ट्रायडंट हॉटेल अडचणीत! बेकायदेशीर बांधकाम पाडण्याचा आदेश; बीएमसीचा अल्टिमेटम, प्रकरण काय?

'T20 वर्ल्ड कपमधून डच्चू मिळाला, आता शुभमन गिल... ', पुजाराचे IPL 2026 साठी गुजरात टायटन्सबाबत मोठं भाकीत

Baby Girl Born : गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कन्यारत्नाचे आगमन... आणि तेही रुग्णवाहिकेत! ; ‘१०८’ टीम ठरली देवदूत

Latest Marathi News Live Update : जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन व इलेक्ट्रिक शेगड्यांचा तुटवडा

Broiler Chicken : बॉयलर जिवंत कोंबड्यांना उच्चांकी दर; चिकनच्या दरात मोठी वाढ

SCROLL FOR NEXT