पुणे

दोन लाख शेतकऱ्यांना अग्रीम

CD

वर्धा जिल्ह्यातील २.३८ लाख
शेतकऱ्यांना अग्रिम मदत

कमी पावसामुळे २.६९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

ॲग्रोवन वृत्तसेवा
वर्धा : कमी पाऊस आणि पावसाच्या दीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील २.६९ लाख हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २ लाख ३८ हजार ६५० खातेदार शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत देण्याचा शासनादेश जारी करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सात तालुक्यांचा दुष्काळी परिस्थितीच्या ट्रिगर-१ मध्ये समावेश झाल्यानंतर पीक नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आले. त्यानंतर जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यांचा ट्रिगर-२ मध्ये समावेश झाला. कमी पाऊस आणि पावसातील दीर्घ खंडामुळे जिल्ह्यातील १ हजार ३५४ गावांतील शेती बाधित झाली आहे. संयुक्त पंचनाम्यांमध्ये २ लाख ६९ हजार १३३.०२ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.
जिल्हा प्रशासनाने १६ ऑक्टोबर रोजी नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार शासनाने दिवाळीपूर्वी घोषित केलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रिम मदतीसाठी शासनादेश जारी केला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील नुकसानीने आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र, ही रक्कम प्रत्यक्ष खात्यात कधी जमा होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Cabinet Decisions : मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय; सहकारी संस्थांवर ५ शासकीय संचालकांची नियुक्ती होणार; नेमकी काय अधिनियमात सुधारणा

तर १५- २० वर्षांपूर्वीच आई गेली असती... आईच्या आठवणीत ढसाढसा रडला TMKOC चा मराठमोळा अय्यर; म्हणाला- मी घर घेतलं तेव्हा...

Bank Election: कराड सोसायटी गटातील लढतीने तालुक्यातील भोसले-उंडाळकर गटाच्या ताकदीवर शिक्कामोर्तब!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी प्रत्येकवेळी पंतप्रधानांवर टीका करू नये – रामदास आठवले

Gokul Government Nominated Members : गोकुळवर चार शासननियुक्त सदस्यांना मतदानाचा अधिकार मिळणार; गुलाबराव पाटील यांनी दिली माहिती

SCROLL FOR NEXT