warehouse owner arrested connection with death of three workers in Wagholi crime police esakal
पुणे

Pune Crime : वाघोलीतील तीन कामगारांच्या मृत्यूप्रकरणी गोडाऊन मालकाला अटक

वाघोली येथील गोडावूनला लागलेल्या आगीत तीन तरुण कामगारांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वाघोली येथील गोडावूनला लागलेल्या आगीत तीन तरुण कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी गोडाऊन मालक आशिष सर्जित अग्रवाल (वय ४०, रा. प्रेमनगर, बिबवेवाडी) याला अटक केली आहे.

वाघोली परिसरातील उबाळेनगर येथील शुभ सजावट गोडावूनला शुक्रवारी (ता. ५) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. त्यात गोडावूनमधील कामगार कमल मुकुल बार (वय २५) हा आगीत जखमी झाला.

त्यावेळी स्वत:ला वाचविण्यासाठी तो गोडावूनमधील पाण्याच्या टाकीत उतरला. परंतु त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर बिजन मिलन पात्र (वय २४) आणि विश्वजीत सन्यासी सेन (वय २७, सर्व मूळ रा. पश्चिम बंगाल) यांचा होरपळून मृत्यू झाला.

गोडावूनचा मालक आशिष अग्रवालने कामगारांना गोडावूनमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती. परंतु गोडावूनमध्ये अग्निशामक दल, विद्युत विभाग, बांधकाम विभाग आणि पोलिसांची परवानगी घेतली नाही.

तसेच, कामगारांच्या सुरक्षिततेबाबत उपाययोजना केलेली नव्हती. या प्रकरणी पोलिस हवालदार धनंजय गोंगे यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अग्रवाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र गोडसे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT