पर्वती - पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात आलेल्या वारकऱ्यांनी महादेवाचे दर्शन घेतले. 
पुणे

Wari 2019 : आनंदला वैष्णवांचा मेळा

सकाळ वृत्तसेवा

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्‌गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मुक्कामी असतानाच बहुप्रतीक्षित पावसाने पुण्यात दमदार हजेरी लावली. पुण्यात विसावलेला वैष्णवांचा मेळा पावसाच्या आगमनाने सुखावला. काही ठिकाणी वारकऱ्यांची दुपारच्या विश्रांतीची गैरसोय झाली खरी. पण, ‘पांडुरंग हरी’ म्हणत त्यांनी पर्यायी व्यवस्थेचा आसरा घेतला.

महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. वारकरी वारी निघेपर्यंत पावसाची वाट पाहत होता.

पावसाअभावी पेरण्याही रखडल्या होत्या. अखेर सर्व भिस्त ‘आपल्या पांडुरंगावर’ सोडून राज्याच्या विविध भागांतून वारीमध्ये सहभागी होण्यासाठी ते आळंदीत दाखल झाले. पंढरीच्या वाटेवर पुण्याच्या मुक्कामीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाकडे डोळे लागलेल्या वैष्णवांचा मेळावा सुखावला. त्यांनी आपापल्या गावी फोन करून तेथील पावसाची स्थिती जाणून घेतली. 

दरम्यान, पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पावसाच्या एक-दोन सरी दुपारपर्यंत पडून गेल्या होत्या. वारकऱ्यांचे दुपारचे जेवण झाल्यानंतर वामकुक्षीच्या वेळी पावसाच्या दमदार सरींनी सुरवात केली. तास-दीड तासानंतरही पावसाचा जोर कायम होता.

पालखी सोहळ्यातील क्षणचित्रे

  • पेठांमध्ये भक्तिमय वातावरण
  • रांगेत उभे राहून घेतले तुकोबा, माउलींचे दर्शन
  • अचानक आलेल्या जोरदार पावसाने वारकरी, पुणेकरांची एकच धांदल उडाली
  • समाजसेवी संस्थांकडून चहा, खाद्यपदार्थांचे वाटप
  • नाना पेठेत विठ्ठल रुक्‍मिीणीची लक्षवेधक प्रतिकृती
  • विद्यार्थ्यांकडून पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा संदेश
  • पालख्यांच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी
  • पोलिस प्रशासनाकडून चोख नियोजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: कायदाक्षेत्रातील पुरुषप्रधान वर्चस्वाला आव्हान... महिला वकिलांसाठी महत्त्वाची जनहित याचिका; सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक लढाई

धक्कादायक! क्रिकेट बोर्डाच्या नव्या अध्यक्षांच्या घरावर गोळीबार, प्रकरण काय? जाणून घ्या

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी मोडणार गेलचा षट्कारांचा विक्रम; माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांचा विश्वास

Petrol-Diesel Price: केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीआधी इंधनाचे नवे दर जाहीर! मुंबई-पुणे आणि राज्यभरात आता पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

KKR Brand Value: बाबो! KKR ची ब्रँड व्हॅल्यू मुंबई-चेन्नईपेक्षा जास्त; तर सर्वात कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये कोण अव्वल?

SCROLL FOR NEXT