Crime News esakal
पुणे

वारजे: तडीपार गुन्हेगारावर अंधाधुंद गोळीबार; रावण गँगवर संशय

सकाळ वृत्तसेवा

शिवणे गणेश मंदिर परिसरात रविवारी मध्यरात्री गोळीबाराची घटना घडली आहे. टोळीयुद्धातुन हा प्रकार घडल्याची शक्यता आहे.

पुणे- गुन्हेगारी कारवायामुळे तडीपार केलेल्या एका सराईत गुन्हेगारावर रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास 10 ते 15 जणाच्या टोळक्याने अंधाधुंद गोळीबार केला. या घटनेत सराईत गुन्हेगाराला 2 ते 3 गोळ्या लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शिवणे गणेश मंदिर परिसरात घडली. हा प्रकार टोळीयुद्धातुन झाला असल्याची शक्यता आहे. उत्तमनगर पोलिसांसह गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाकडून आरोपींचा शोध घेतला आहे. केदार भालशंकर (वय 25, रा. रामनगर, वारजे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. (Pune Latest News)

केदार भालशंकर हा रविवारी रात्री त्याच्या चारचाकी गाडीतून वारज्याच्या दिशेने जात होता. त्यावेळी गाड्यामधून आलेल्या 10 ते 15 जणाच्या टोळक्याने त्याच्यावर शिवणे येथील गणेश मंदिर परिसरात अंधाधुंद गोळीबार केला. आरोपीनी केदारच्या दिशेने 6 ते 7 वेळा गोळीबार केला. त्यामध्ये केदारलाल 2 ते 3 गोळ्या लागल्या, एक गोळी त्याच्या पाठीमध्ये लागली. या घटनेनंतर आरोपीनी पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच उत्तमनगर पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी केदारला उपचाराठी रुग्णालयात दाखल केले.

'रावण गँग'कडून हा गोळीबार झाल्याची शक्यता

अवैध मटका व्यवसायातील भावड्या सकपाळ याचा केदार भालशंकर हा जवळचा आहे. केदारची नीलेश गायकवाड टोळी व रावण गँग विरुद्ध भांडणे आहेत. त्यातूनच हा प्रकार घडला असल्याचे केदारने पोलिसांना सांगितले आहे. त्या दिशेने पोलिसांचा शोध सुरु आहे. हा सर्व प्रकार पूर्ववैमनस्य व टोळीयुद्धातून झाला असण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिसांनी अद्याप माहिती दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election 2026 : 'गोकुळ निवडणूक बिनविरोधसाठी प्रस्ताव नाही, आम्ही सर्व जागा लढवणार'; सतेज पाटलांची मोठी घोषणा, 'महायुती'वरही साधला निशाणा

'धाकट्या सुनबाई' मध्ये दिसणार लोकप्रिय इन्फ्लुएन्सर; कोण आहे ती? 'अशी' आहे झी मराठीच्या नव्या मालिकेची कथा

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT