पुणे

संचारबंदीच्या धास्तीने कार्तिकी आधीच वारकरी आळंदीत दाखल

सकाळवृत्तसेवा

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदीत होणाऱ्या कार्तिकी वारीसाठी राज्य सरकारच्या संचारबंदीच्या आदेशाची अधिकची वाट न पाहता वारकरी दिंडी घेऊन आळंदीत येऊ लागले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदाची यात्रा रद्द होण्याची शक्यता असूनही, वारकऱ्यांना दर्शनाची आस मात्र, कायम असल्याचे चित्र आहे.

पंढरपूरला नुकत्याच झालेल्या कार्तिकी यात्रेत तीन दिवस कडेकोट संचारबंदी होती. या पार्श्वभूमीवरही आळंदीत आठ दिवसांसाठी संचारबंदीची शक्यता बोलली जात आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे आळंदी देवस्थान, वारकरी आणि प्रशासनाशी संवाद साधत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त आळंदी ८ डिसेंबरपासून १४ डिसेंबरपर्यंत वारी होणार आहे. मात्र, महसूल व पोलिस प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचा प्रस्ताव दिला. यामुळे मंदिराच्या आतील बाजूस देवस्थानचे नैमित्तिक कार्यक्रम मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थीतीत पार पडण्याची शक्यता बोलली जात आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अनेक वारकऱ्यांनीही वारी रद्दबाबतची मानसिकता तयार केली आहे. तसेच, शहरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांनीही कार्तिकी होणार नसल्याने खरेदी केली नाही. परिणामी शहरातील सगळे व्यवहार ठप्प आहेत. कार्तिकी वारीत दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. यंदा मात्र, ती होणार नसल्याचे चित्र आहे. आता राज्य सरकारची संचारबंदी नेमकी कधीपासून होणार, याची प्रतीक्षा वारकरी आणि स्थानिक शहरवासीयांना आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

यंदाच्या वारीवर कोरोनाचे संकट असले, तरी वारकरी मात्र घरी थांबायला तयार नाहीत. कुणी एसटीने, तर कुणी स्वतःच्या गाडीने वारी अगोदरच दर्शन करून जात असल्याचे चित्र आहे. आज पंचवीस ते तीस वारकरी दिंडी घेऊन आळंदीत आले. अद्याप शहराच्या सीमा बंद नसल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला वेळीच भूमिका घ्यावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

Dhule Crime : दारूच्या नशेत पत्नीवर प्राणघातक हल्ला, धुळे कोर्टाने सुनावली ५ वर्षांची शिक्षा

SCROLL FOR NEXT