warning to anand dave president of brahmin federation in pune after bjp nupur sharma case  sakal
पुणे

केंद्रीय यंत्रणेचा ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना सतर्क राहण्याचा इशारा

नूपुर शर्मा यांच्या व्यक्तव्यावरून देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीतीच्या पार्श्‍वभूमीवर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केंद्रीय यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या व्यक्तव्यावरून देशभरात निर्माण झालेल्या परिस्थितीतीच्या पार्श्‍वभूमीवर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांना केंद्रीय यंत्रणेकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्रीय यंत्रणेने दवे यांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पुणे पोलिसांना आवाहन केले आहे की दवे यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. काही दिवसांपूर्वी नूपुर शर्मा हिने महम्मद पैगंबर यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्यानंतर तिच्या समर्थनात पोस्ट केल्यानंतर उदयपूर येथे दोन तरुणांनी कन्हय्या लाल नावाच्या एका टेलरची निर्घृण हत्या केली होती. त्यानंतर अमरावतीमधील औषध विक्रेता उमेश कोल्हे यांनी नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर समाजमाध्यमावर प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यांचा देखील खून करण्यात आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Latest Marathi News Updates : पुण्यात पुढचे ३ तास धोक्याचे, मुसळधार पावसाची शक्यता

Chandrapur News : पतीचं दुखणं बरं होईना, जमापुंजीही संपली; बिल कसं भरायचं? पैसे नसल्यानं पत्नीनं रुग्णालयातच संपवलं जीवन

Solapur News: 'बेपत्ता रिक्षाचालकाचा ‘सीडीआर’वरून शोध'; दुसऱ्या दिवशीही सापडला नाही, जुना पूना नाका ते देगाव ब्रीजपर्यंत शोधले

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

SCROLL FOR NEXT