Indapur sakal
पुणे

शासनाने आठ दिवसात मंदीरे खुली न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

इंदापूर इंद्रेश्वर मंदिरात घंटानाद करून पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर: शासनाने राज्यात मद्यालये, सर्व शासकीय कामे, उदघाटने तसेच विविध कार्यक्रमास कोरोना महामारीत परवानगी दिली मात्र गेली अनेक दिवस कोरोना संसर्गाचे कारण पुढे करत राज्यातील मंदीरे बंद केली आहेत. त्यामुळे शासनाने आठ दिवसात मंदीरे खुली न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा इंदापूर इंद्रेश्वर मंदिरात घंटानाद करून भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाकडून देण्यात आला. भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

यावेळी पांडुरंग शिंदे म्हणाले, राज्यशासनाने कोरोनाच्या नावाखाली सर्व मंदिरे बंद केली मात्र शासनाचे सर्व कार्यक्रम, उदघाटने चालू आहेत. पंढरपूरची पोटनिवडणूक देखील कोरोना असताना झाली, मात्र हिंदू धर्मातील श्रावण महिना चालू असताना सर्व भाविक भक्तांना मंदिरात जाऊन महादेवाची पूजाअर्चा करता येत नाही. आपणा सर्वांचे श्रद्धास्थान असणाऱ्या शिवपार्वती मंदिरामध्ये शासनाने येण्यास बंदी घातली आहे.त्यामुळे शासनाचा आम्ही निषेध करत आहे. शासनाने येत्या आठ दिवसात मंदिरे खुली न केल्यास तीव्र आंदोलन करु असा इशारा शिंदे यांनी दिला. यावेळी प्रेमकुमार जगताप, सचिन कदम, लक्ष्मण कोलते, रवी सुतार, अशोक व्यवहारे ,बाळू भिसे, सुरेश सुतार, ओंकार हिंगमीरे ,भागवत राऊत, संतोष सुतार उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut vs Sanjay Nirupam: 'संजय राऊतांमुळे महाराष्ट्रात अशांतता गुन्हा दाखल करून तुरुंगात टाका'; संजय निरुपम यांची मुंबई पोलिसांकडे मागणी

Patna: धक्कादायक घटना! ३० वर्षीय युतवतीवर सामूहिक अत्याचार... गुप्तांगात आढळला काडतूस व लाकडाचा तुकडा, अरोपी मोकाट

IND VS AFG 3RD ODI: हर्षित राणा IN, 2 खेळाडू OUT! भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल, प्रशिक्षकाने दिले अपडेट्स; रोहितचा ओपनिंग पार्टनर कोण?

Latest Marathi Live Updates: सीमा प्रश्नावरून महाराष्ट्र एकीकरण समितीला कर्नाटकात अडवले, ठिय्या आंदोलन

Hormuz Strait : होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांची प्रचंड रांग; इराणने कडक नियम जाहीर केले, ४८ तास आधी अर्ज अनिवार्य

SCROLL FOR NEXT