दुष्काळी पंचनाम्यांत
शेतकऱ्यांचे संपूर्ण क्षेत्र नोंदवा
वरुड तालुक्यातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी
ॲग्रोवन वृत्तसेवा
अमरावती : वरुड तालुक्यात कोरड्या दुष्काळाच्या पंचनाम्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रत्यक्ष लागवड क्षेत्र पूर्णपणे नोंदविण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पंचनाम्यांत ०.०३ ते ०.१५ आर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्र कमी नोंदविले जात असल्याने पात्र शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीत आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते, अशी भीती निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.
वरुड तालुक्यातील सर्व महसूल मंडळे आणि गावांमध्ये दुष्काळी पंचनामे व नोंदणी करताना सातबारा उतारा आणि प्रत्यक्ष लागवड क्षेत्रानुसार संपूर्ण क्षेत्राची नोंद घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. पंचनाम्यांमध्ये क्षेत्र कमी नोंदविल्यास शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची रक्कम कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना अचूक नोंदणीबाबत स्पष्ट सूचना देण्याची मागणीही करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी बियाणे, खते, कीटकनाशके, फवारणी, मजुरी आणि मशागतीवर खर्च केला आहे. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. अशा परिस्थितीत पंचनाम्यांमध्ये क्षेत्र कमी नोंदविले गेल्यास नुकसानभरपाई मिळताना त्यांना फटका बसू शकतो. यापूर्वी झालेल्या पंचनाम्यांमध्ये क्षेत्र कमी नोंदविले असल्यास त्यांची पुनर्तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी आणि पात्र शेतकऱ्यांना शासनाच्या निकषांनुसार संपूर्ण मदत मिळावी, असेही निवेदनात नमूद आहे. निवेदन देते वेळी सुरेंद्र ठाकरे, अंकुश बोडनासे, मनोज गुर्जर, अमोल भडांगे आणि चंद्रकांत बोडनासे यांच्यासह तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.