पुणे

वाशीम जिल्ह्यात ६ हजार ९८१ शेतकऱ्यांना ७२ कोटींचा लाभ अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा तिसरा टप्पा

CD

वाशीम जिल्ह्यात ६९८१
शेतकऱ्यांना ७२ कोटींचा लाभ

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा तिसरा टप्पा

वाशीम : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वाशीम जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपैकी आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६ हजार ९८१ शेतकऱ्यांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात ७२ कोटी ७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. पहिला, दुसरा आणि तिसरा टप्पा मिळून आतापर्यंत ५० हजार ६४१ पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ४४६ कोटी ९८ लाख रुपये जमा झाले आहेत.
राज्य शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. वाशीम जिल्ह्यात सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) तसेच राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व खासगी बँकांमधील एकूण ६२ हजार ८८७ पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापैकी आतापर्यंत ५३ हजार ९५७ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले असून, ८ हजार ९३० शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी असणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी विशिष्ट क्रमांक व आधार क्रमांक घेऊन नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करावे. बहुतांश पात्र लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणीअभावी बाकी असल्याने संबंधित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडीची नोंदणी करून आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा उपनिबंधक माणिकराव लटपटे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अपघातात ३ सख्ख्या भावांचा मृत्यू, नव्या बुलेटवरून जाताना अज्ञात वाहनाची धडक; तिघांचंही वय १२ ते १६

ओये बिर्याणी एक और कॅच छोड़ ना!’ भारतीय फॅन्सनी सैम अयूबची घेतली फिरकी; आधी वैभवला OUT करून पाळणा हलवला, नंतर दोन कॅच सोडले VIDEO व्हायरल

इन्स्टावर मुलीचे २ लाख फॉलोअर्स, मुलासाठी आलेलं स्थळ पालकांनी नाकारलं

Latest Marathi News Live Update : कराडला तीन एकरातील ऊसाला आग, ऐन दुष्काळात शेतकऱ्याला फटका

Asian Games, IND vs PAK: भारताने पाकिस्तानला पार चारी मुंड्या चित करत जिंकले GOLD! सलग दुसऱ्यांदा सुवर्णकामगिरी

SCROLL FOR NEXT