पुणे

वाशीम : गहू, हरभऱ्यासाठी १५ डिसेंबर, तर उन्हाळी भुईमुगासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत

CD

वाशीम जिल्ह्यात रब्बी
पीक विमा योजना लागू

गहू , हरभरा आणि भुईमुगाचा समावेश

ॲग्रोवन वृत्तसेवा
वाशीम : जिल्ह्यात रब्बी हंगामाकरिता पंतप्रधान पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. योजनेत गहू (बागायत), हरभरा आणि उन्हाळी भुईमूग या पिकांसाठी विमा संरक्षण घेता येणार आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी केले आहे.

रब्बी हंगामात गहू (बागायत), हरभरा आणि उन्हाळी भुईमूग या तीन पिकांसाठी अधिसूचित महसूल मंडळ किंवा क्षेत्रातील शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभागी होता येणार आहे. शेतकऱ्यांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक आहे.

गहू (बागायत) आणि हरभरा या पिकांसाठी १५ डिसेंबर २०२६, तर उन्हाळी भुईमूग पिकासाठी ३१ मार्च २०२७ ही विमा नोंदणीची अंतिम मुदत आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेकडे विहित नमुन्यात अर्ज सादर करावा. योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी संबंधित बँकेला लेखी कळविणे आवश्यक आहे.

शेतकऱ्यांना पीकविमा योजनेच्या https://pmfby.gov.in या संकेतस्थळावर स्वतः ऑनलाइन नोंदणी करता येईल. तसेच बँका, विमा कंपनीचे नियुक्त प्रतिनिधी, क्रॉप इन्शुरन्स ॲप आणि सामूहिक सेवा केंद्रांमार्फतही अर्ज करता येणार आहेत.

वाशीम जिल्ह्यासाठी बजाज जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडची विमा कंपनी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. योजनेविषयी अधिक माहितीसाठी विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Air Pollution: पुण्यात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे वाढलं वायू प्रदूषण; श्वसनाचे आजार टाळण्यासाठी डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Trump Iran War : अमेरिकेतील पराभवानंतर ट्रम्प यांच्या अडचणी वाढणार? इराणचा आक्रमक पवित्रा; इस्रायलवरून थेट निशाणा

Thane Crime: मृत जमीनमालकाच्या नावावर व्यवहार, मुंब्यातील प्रकरणात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Live News : कर्नाटक सरकारने E20 इंधन चाचणीबाबत जारी केलेले संयुक्त निवेदन फेटाळले - मंत्री रिझवान अरशद

शेख हसीना बांगलादेशात परतणार? नव्या पासपोर्ट आणि राष्ट्रीय ओळखपत्रासाठी दिल्लीतील दूतावासाकडे अर्ज

SCROLL FOR NEXT