पाचगणीत कचरा वेचकांचा गौरव
पाचगणी, ता. ३ : आंतरराष्ट्रीय कचरा वेचक दिन २०२६ निमित्त पाचगणी नगरपालिका व हिलदारी यांच्या वतीने कचरा वेचकांचा सन्मान करण्यात आला, तसेच आरोग्य सुरक्षा साहित्य, विमा योजनांची कार्डचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमासाठी मुख्याधिकारी पंडित पाटील, नगराध्यक्ष दिलीप बगाडे, उपनगराध्यक्ष प्रकाश गोळे यांच्यासह सर्व नगरसेवकांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाला आरोग्य सभापती राजश्री सणस, नगरसेवक सुप्रिया माने, माधुरी कासुर्डे, शिल्पा माने, गणेश कासुर्डे आणि आकाश बगाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात करताना डॉ. मुकेश कुळकर्णी यांनी या दिनाचे महत्त्व आणि कचरा वेचकांचे समाजातील स्थान स्पष्ट केले. शहरातील कचरा गोळा करताना कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असल्याचेही सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कचरा वेचकांना कामाच्या ठिकाणी आवश्यक असणारे बूट, हातमोजे, मास्क आणि जॅकेट यांसारख्या सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात आले. सुरक्षिततेसोबतच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘आयुष्मान भारत’ आणि ‘आभा’ कार्डांचे, तर भविष्य सुरक्षित करण्यासाठी ‘प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना’ व ‘प्रधानमंत्री सुरक्षा बिमा’ योजनांच्या प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी कचरा वेचकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी माधवी जगदाळे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी स्वयंसहायता गटांच्या स्थापनेचे महत्त्व सांगून, बचतीचे फायदे आणि गटांच्या माध्यमातून मिळणाऱ्या शासकीय सवलतींची माहिती दिली. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गणेश कासुर्डे, निखिल खरात, दीपाली धनवडे, अस्मिता कासुर्डे, प्राजक्ता बोडरे व दीपक मदने यांनी विशेष परिश्रम घेतले.
07360
पाचगणी : कचरा कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देताना राजश्री कासुर्डे. त्या वेळी सुप्रिया माने, गणेश कासुर्डे व इतर. (रविकांत बेलोशे ः सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.