पिंपरी, ता. १६ : ‘‘पिंपरी चिंचवड शहरातील घनकचरा व्यवस्थापनाचे विकेंद्रीकरण केले जाणार आहे. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालय क्षेत्रात प्रत्येकी एक असे १० अत्याधुनिक कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यांसाठी योग्य जागा तातडीने निश्चिती करून केंद्र उभारणीचे नियोजन करा,’’ असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांना गुरुवारी (ता.१६) दिले.
मोशी कचरा डेपोतील दुर्घटनेचे पडसाद बुधवारी (ता. १५) महापालिका सर्वसाधारण सभेत उमटले होते. त्यावर आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी भविष्यातील नियोजनाबाबत माहिती सभागृहाला दिली. त्यानुसार क्षेत्रीय कार्यालय स्तरावर अत्याधुनिक कचरा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येणार आहेत. यची जबाबदारी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यावर सोपवली आहे. त्यांनी सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कार्यकारी अभियंत्यांची प्राथमिक बैठक गुरुवारी (ता.१६) घेतली. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील उपलब्ध जागांचा आढावा घेतला. कचरा प्रक्रिया केंद्रासाठी योग्य जागा निश्चित करण्याच्या सूचना केल्या.
महापालिकेची तयारी...
- शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करण्यासाठी विकेंद्रित यंत्रणा उभारण्यावर भर
- कचरा विकेंद्रित यंत्रणेअंतर्गत दहा क्षेत्रीय कार्यालयस्तरावर प्रत्येकी एक अत्याधुनिक केंद्र असणार
- प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयस्तरावरील कचरा प्रक्रियेमुळे मोशी कचरा डेपोवरील ताण कमी होण्यास मदत होईल
- प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयस्तरावर जागा निश्चितीनंतर अत्याधुनिक कचरा प्रक्रिया केंद्र उभारणीचे काम टप्प्याटप्प्याने हाती घेतले जाईल
- जागा निश्चिती प्राधान्याने पूर्ण करून प्रक्रिया केंद्र उभारणीचा आराखडा तातडीने सादर करण्याचा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचा प्रशासनाला आदेश
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.