ओंकारेश्‍वर मंदिर - गंगाधर केळकर यांची स्वच्छ करण्यात आलेली समाधी.
ओंकारेश्‍वर मंदिर - गंगाधर केळकर यांची स्वच्छ करण्यात आलेली समाधी.  
पुणे

‘डकवीड’ वनस्पतीमुळे पाणी झाले स्वच्छ

सकाळवृत्तसेवा

पुणे - ‘डकवीड’ या लेमनेशिया जातीमधील वनस्पतीमुळे गंगाधर रघुनाथ केळकर यांची समाधी असलेल्या टाकीमधील पाणी स्वच्छ होऊन त्याला नवे रूप मिळाले आहे. कचरा, गाळ, सांडपाणी, दारूच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, पिंडदानाचे साहित्य, देवांच्या फुटलेल्या प्रतिमा टाकल्याने या समाधीचा परिसर अस्वच्छ झाला होता. नदीपात्रातील ओंकारेश्‍वर मंदिराच्या जवळ ही समाधी आहे. 

संपूर्ण शहरातील शेकडो जागा कचऱ्याच्या, सांडपाण्याच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. लेम्नीऑन ग्रीन सोल्यूशन या कंपनीच्या प्रसन्न जोगदेव या तरुणाने केळकर यांची समाधी स्वच्छ करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबविला. 

‘डकवीड’ या लेमनेशिया जातीच्या वनस्पतीचा वापर त्यांनी पाणी स्वच्छ करण्यासाठी केला. या पाण्यामध्ये गप्पी मासेही टाकण्यात आले आहेत. यामुळे पाणी शुद्ध होण्यास आणखी मदत झाली. 

डकवीड वनस्पतीचा रंग हिरवा असल्यामुळे पाण्यावर हिरवा थर साचलेला दिसतो. परंतु, त्याखाली पाणी स्वच्छ झालेले असते. असे असले तरी नागरिक त्यामध्ये कचरा टाकणे सोडायला तयार नाहीत. यासाठी एका एनजी-ओच्या मदतीने त्याचे रंगकाम करून, त्यावर चित्रे काढली. चौथरा रंगवून घेण्यात आला आहे. तरीही पिंडदानासाठी आलेले लोक राहिलेले साहित्य या समाधीच्या परिसरातील पाण्यात टाकत आहेत. नगरसेवक राजेश येनपुरे, तसेच पालिकेचे आरोग्य निरीक्षक रविराज बेंद्रे यांनी या प्रकल्पासाठी साहाय्य केले.

डासांचे प्रजनन कमी होण्यास मदत
डकवीड या वनस्पतीमुळे पाण्याचा पृष्ठभाग झाकला जाऊन डासांचे प्रजनन कमी होते, दुर्गंधी कमी होते. या वनस्पतीची मुळे आणि सूक्ष्मजंतू याने पाणी शुद्ध होते, फर्ग्युसन महाविद्यालयातील नील वाणी याने यातील होणारे जल शुद्धीकरण, डकवीडची होणारी वाढ व पाण्याच्या चाचण्या करून त्यावर प्रबंध लिहिला आहे.

आम्ही लेम्नीऑनमध्ये झाडे आणि सूक्ष्मजंतूंच्या माध्यमातून पाणी शुद्ध करणाऱ्या सिस्टिम्स डिझाइन करतो. त्याचा पहिला प्रयोग आम्ही येथे केला आहे. या कामात मदत करणाऱ्यापेक्षा समाधिस्थळात कचरा टाकणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. येथे घाण करण्यावर निर्बंध घालणे जरुरीचे आहे. 
- प्रसन्न जोगदेव, संस्थापक, लेम्नीऑन ग्रीन सोल्यूशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT