पुणे

पिंपळगाव माळवी तलावातील पाणी उपशाची तक्रार केल्याने तरुणासह वडिलांना मारहाण

CD

पाणी उपशाची तक्रार केल्याने मारहाण

नगर तालुका, ता. १४ ः महापालिका मालकीच्या पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथील तलावातून सुरू असलेल्या बेकायदेशीर पाणी उपशाची शासकीय कार्यालयात तक्रार केल्याच्या रागातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना टोळक्याने मारहाण करून लुटले. या घटनेत तरुण जखमी झाला आहे. आरोपींनी त्याच्याकडील १० हजार ५०० रुपयांची रोकड आणि सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली. याप्रकरणी तिघांसह अनोळखी व्यक्तींविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

गोरक्षनाथ भाऊसाहेब आढाव (वय ३०, रा. पिंपळगाव माळवी) यांनी फिर्याद दिली आहे. १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गोरक्षनाथ हे वडील भाऊसाहेब यांच्यासह कामानिमित्त गावात गेले होते. तेथून परतताना आढाववाडी अमरधामसमोर योगेश झिने, संतोष झिने, नितीन झिने आणि तोंडाला बांधलेले तीन ते चार अनोळखी इसमांनी त्यांना अडवले. तलावातील पाण्याच्या मोटारींबाबत वरिष्ठ कार्यालयात तक्रार का केली, असा जाब विचारत शिवीगाळ केली. त्यानंतर दोघांनाही मारहाण केली. यावेळी खिशातील रोकड आणि हातातील अर्धा तोळ्याची सोन्याची अंगठी हिसकावली. नागरिक जमा होऊ लागल्याने आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला.
जखमी आढाव यांच्यावर अहिल्यानगर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime News : पैशांच्या वादातून रक्ताचा सडा! साडूनेच साडूचा केला निर्घृण खून अन् नंतर उचललं टोकाचं पाऊल; मिरज तालुक्यात खळबळ!

'संजय दत्तच्या केससाठी बाळासाहेबांनी मातोश्रीवर बोलावलं अन्...' उज्ज्वल निकम यांनी सांगितला किस्सा, म्हणाले...

Jellyfish in Anjarle Sea Beach : आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा वावर वाढला; समुद्रात अंघोळ करताना १४ वर्षीय मुलीला स्पर्श, त्वचेवर खाज, जळजळ

Latest Marathi News Live Update: रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये वाद मिटेना, नेमकं काय घडतंय?

PM Modi: पंतप्रधान मोदींकडे डीके शिवकुमारांनी केली 'ही' मागणी; काँग्रेसमधूनच कडाडून विरोध; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT