पुणे

कोल्हापूरः पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा आजऱ्यात दुष्काळ परिस्थितीबाबत आढावा बैठक

CD

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा

आजऱ्यात दुष्काळ परिस्थितीबाबत आढावा बैठक

ॲग्रोवन वृत्तसेवा
आजरा, जि. कोल्हापूर : पुरेसा पाऊस न झाल्याने उन्हाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. आपल्या सर्वांसमोर भीषण वास्तव्य मांडले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी, ग्रामस्थांनी पाणी जपून वापरावे. पाण्याचा अपव्यय टाळावा. ग्रामपंचायतीने नळ जोडण्यांना तोट्या बसवाव्यात. कमी पाण्यावरची पीक घ्यावीत, असे आवाहन आजरा पंचायत समितीच्या प्रभारी सभापती यशोदा पोवार यांनी केले.

येथील आजरा पंचायत समितीमध्ये दुष्काळ परिस्थितीबाबत आढावा बैठक झाली. यावेळी पाटबंधारे, वीज वितरण, वनविभाग, पंचायत समिती कृषी, पशुसंवर्धन विभागाचा आढावा घेतला. जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई, पंचायत समिती सदस्य समीर पारदे, गटविकास अधिकारी सुभाष सावंत, शिवसेना (ठाकरे गट) तालुका अध्यक्ष युवराज पोवार प्रमुख उपस्थित होते.

सुधीर देसाई म्हणाले,‘‘जलजीवन मिशनमधील पाणी पुरवठा योजना अपूर्ण आहेत. या योजनांची कामे मार्गी लावावीत. यासाठी ठेकेदारांना विनंती केली आहे. विंधनविहिरी अधिग्रहण व कूपनलिकेबाबत सूचना दिल्या आहेत. पाटबंधारे व वीज वितरण यांनी समन्वयाने काम करावे.’’

आजरा पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी अजिंक्य आबिटकर यांनी प्रकल्पामधील पाणीसाठ्याची माहिती दिली. ते म्हणाले,‘‘हिरण्यकेशी, चित्रा नदीवरील ३२ बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा केला आहे. चित्रीवर आजरा व गडहिंग्लजमधील ७२ ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याचा योजना आहेत.’’

आजरा परिक्षेत्र वनाधिकारी सचिन सावंत म्हणाले, ‘‘वनपरिक्षेत्रात ४८ वनराई बंधारे लोकसहभागातून बांधले असून, मार्चपर्यंत पाणीसाठा राहील. वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्यासाठी कूपनलिका काढण्याचा प्रस्ताव आहे.’’ सहायक आयुक्त पी. सी. मुत्तेफोड म्हणाले, ‘‘तालुक्यात ४३ हजार ३२७ पशुधन आहे. तालुक्यात ५६ हजार टन चारा उपलब्ध आहे. चाऱ्यासाठी ६६०० किलो मका, ज्वारी बियाण्याचे वाटप केले जाणार आहे.’’ ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी सतीश केदार यांनी अहवाल मांडला. गटविकास अधिकारी श्री. सावंत, कृषी अधिकारी दिनेश शेटे, युवराज पोवार यांनी सूचना मांडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dwayne Johnson Health : 'द रॉक'ला गंभीर आजार झाल्याची चर्चा? २२ किलो वजन घटल्यानंतर व्हायरल दाव्यामागचे खरे सत्य समोर!

Social Media: एका ओळीची पोस्ट अन् थेट PM मोदींचा रिप्लाय; हा नेटकरी आहे तरी कोण?

Sinhgad Institute : अखेर ‘सिंहगड संस्थे’च्या सात महाविद्यालयांवर ‘प्रशासक’; सात महाविद्यालयांचे व्यवस्थापन शासनाच्या ताब्यात

ISC & ICSE Exam : ‘आयएससी’ची परीक्षा ९ फेब्रुवारीपासून, तर आयसीएसईची १५ फेब्रुवारीपासून; ‘सीआयएससीई’तर्फे दहावी-बारावीचे वेळापत्रक जाहीर

Latest Marathi News Live Update : प्रदीप पुर्णेकर हत्याप्रकरणाच्या तपासाला पुन्हा वेग! आज महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT